विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Waqf Board प्रयागराज मध्ये सनातन धर्म संसदेत सर्व संत महतांनी एकत्र येऊन संमत केलेल्या सनातन हिंदू बोर्डाला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा दावा केला, पण याच काँग्रेसने मुस्लिम वक्फ बोर्डाच्या कट्टरतेला मात्र घटनात्मक वैधता प्राप्त करून दिली आणि वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केला.Waqf Board
प्रयागराज मध्ये महा कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातील सर्व धर्मपीठांच्या पीठाधीश्वरांनी आणि संत महंतांनी एकत्र येऊन धर्मसंसद आयोजित केली. या धर्म संसदेमध्ये सर्व संत महांतांनी एकत्र येऊन सनातन हिंदू बोर्ड अधिनियम भारतात लागू करण्याची मागणी केली. देशात जर मुस्लिमांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड अस्तित्वात असेल, तर सनातन हिंदू धर्मियांसाठी स्वतंत्र अधिनियम लागू झाला पाहिजे, अशी मागणी सर्व संतांनी केली. सनातन हिंदू बोर्ड अधिनियमाचा एक स्वतंत्र ड्राफ्ट तयार करून तो सरकारला सादर करण्याची तयारी चालवली. सनातन धर्म संसदेतल्या सर्व संत महंतांनी त्या ड्राफ्टवर स्वाक्षऱ्या केल्या.
मात्र काँग्रेसने सनातन हिंदू बोर्ड अधिनियम अस्तित्वात आणायला विरोध केला. काँग्रेसचे प्रवक्ते उदित राज यांनी सर्व संत महंतांवर ते घटनाविरोधी आणि मनुस्मृतीचे समर्थक असल्याचा आरोप केला. धर्म संसदेतील सर्व भाषणे राज्यघटनेच्या विरोधात होती. मनुस्मृतीच्या समर्थनासाठी ते सगळे संत पुढे आले होते. त्यांना देश राज्यघटनेनुसार चालवायचा नसून मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे, असा दावा उदित राज यांनी केला.
मात्र याच उदित राज यांच्या काँग्रेसने मुस्लिम वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केला. मोदी सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकात 44 सुधारणा सुचविल्या. मात्र या सर्व सुधारणा मुस्लिम विरोधी असल्याचा दावा करून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेसह संसदीय समितीच्या बैठकांमध्ये देखील गदारोळ केला. आता तीच काँग्रेस सनातन हिंदू बोर्ड अधिनियम लागू करायला मात्र विरोध करत आहे.
https://x.com/ANI/status/1884102947724046568
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App