काँग्रेसची तिसरी यादी, 7 राज्यांमधून 57 नावे : कोल्हापुरातून शाहू महाराज, सोलापुरात प्रणिती शिंदे, पुण्यात धंगेकर तर नांदेडमधून वसंत चव्हाण

वृत्तसंस्था

मुंबई : काँग्रेसने गुरुवारी (21 मार्च) लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात 7 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 उमेदवारांची नावे आहेत. तीनही याद्यांसह काँग्रेसने आतापर्यंत 139 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.Congress third list, 57 names from 7 states: Shahu Maharaj from Kolhapur, Praniti Shinde from Solapur, Dhangekar from Pune and Vasant Chavan from Nanded.

यात प्रामुख्याने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल पाडवी, लातूरमधून डॉ. शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – वळवंत वानखेडे
लातूर – डॉ. शिवाजी कलगे
नांदेड – वसंतराव चव्हाण

कोल्हापूरच्या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण वर्गाचा हिंदुत्वाकडे ओढा वाढला आहे. अशातच पारंपरिक शाहू विचारांच्या मतदारांना एकत्र करण्याचे काम शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवरून होणार आहे. शिवाय शिंदे गट, राष्ट्रवादीतील गटातील अनेक पारंपरिक कार्यकर्त्यांना शाहू महाराज यांच्याविषयी आदर आहे. ती मते मिळवण्यासाठी शाहू महाराज यांच्या सक्षम उमेदवाराचा चेहरा काँग्रेसकडून पुढे करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) दुसरी बैठक सोमवारी (11 मार्च) सायंकाळी झाली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि सीईसी सदस्य उपस्थित होते. या बैठकीला राजस्थान आणि उत्तराखंडमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

सीईसीची पहिली बैठक 7 मार्च रोजी झाली. 8 मार्च रोजी 39 जागांसाठी पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा आणि त्रिपुरा या लोकसभा जागांसाठी नावांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 16 केरळ, सात कर्नाटक, 6 छत्तीसगड आणि 4 तेलंगणातील होते. मेघालयातून दोन आणि नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि लक्षद्वीपमधून प्रत्येकी एक नावे आली आहेत. या 39 उमेदवारांपैकी 15 सामान्य प्रवर्गातील आहेत आणि 24 अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत.

Congress third list, 57 names from 7 states: Shahu Maharaj from Kolhapur, Praniti Shinde from Solapur, Dhangekar from Pune and Vasant Chavan from Nanded.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात