वंदे मातरमला विरोध : रझा अकादमीच्या पावलावर काँग्रेसचे पाऊल!!


प्रतिनिधी

मुंबई : धर्मांध रझा अकादमीच्या पावलावर प्रदेश काँग्रेसने देखील पाऊल टाकले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयांमध्ये फोनवर बोलताना “हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” म्हणा, असा निर्णय घेण्यात आला. त्याचे पडसाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर उमटू लागले आहेत. याला रझा अकादमीने विरोध केल्यानंतर लागलीच आता काँग्रेसनेही याविरोधात टाहो फोडायला सुरुवात केली आहे. Congress steps in the footsteps of Raza Academy

रझा अकादमी म्हणते, आम्ही फक्त अल्लाला पुजतो 

मंत्री मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतल्याबरोबर रझा अकादमी या कट्टर मुस्लिम संघटनेने याला विरोध केला. रझा अकादमीचे अध्यक्ष सय्यद नुरी यांनी ‘आम्ही केवळ अल्लाला पुजतो, त्यामुळे आम्ही ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही. सरकारने या शब्दाऐवजी पर्यायी शब्द द्यावा’, असे म्हटले. ‘वंदे मातरम’ या शब्दाचा अर्थ ‘माझे या मातृभूमीला वंदन’ असा होतो, नेमके यालाच रझा अकादमीचा आक्षेप आहे. मुसलमान एकेश्वर असतात. त्यामुळे ते अल्लाच्या व्यतिरिक्त कुणालाही वंदन करत नाहीत, मुसलमानांमधील हा धर्मांधपणा आता वंदे मातरम म्हणण्यासाठी विरोध करत आहे. मुसलमानांना राष्ट्रापेक्षा धर्म मोठा वाटतो, याच वृत्तीमुळे रझा अकादमी या धर्मांध मुसलमान संघटनेने विरोध केला आहे.

काँग्रेस म्हणते हा सरकारचा इंग्रजीद्वेष  

रझा अकादमीच्या याच पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसनेही वंदे मातरमला विरोध दर्शवला आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याला सरकारचा इंग्रजी भाषेचा द्वेष असे म्हटले आहे. इंग्रजी म्हणून आवडत नाही मग मंत्री म्हणून खुर्चीत कसे बसणार? पलंगावर कसे झोपणार? खुर्ची, पलंग फारसी शब्द आहेत. बटाटा, कोबी, हापूस, पपई, पेरू, अननस, बिस्कीट खाऊ नका, पोर्तुगीज आहेत ते. सरकारने अक्कल गहाण ठेवली असे आम्ही म्हणणार नाही. कारण सरकार व अक्कल शब्द ही फारसी आहेत, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “वंदे मातरम्” आमचा स्वाभिमान पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. “वंदे मातरम”ला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणे यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळी राजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Congress steps in the footsteps of Raza Academy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात