विशेष प्रतिनिधी
सुरत : देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचाराला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला. मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केल्यानिमित्त सुरतमध्ये रोजगार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. Congress responsible for unemployment
रुपानी म्हणाले, की गुजरातमध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी १९९५ पूर्वी काँग्रेस सरकारने सरकारी नोकरभरतीवर बंदी घातली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने राज्यात दोन लाखांहून अधिक युवकांना रोजगार दिला.
काँग्रेसकडे कसलेच धोरण नसल्याने देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढण्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. जर सरकार रोजगार पुरवू शकत नसेल तर ‘आराम हराम है’ सारख्या घोषणा देणे थांबवावे, असे लोक माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणत असत. कोरोनामुळे लाखो जणांनी नोकऱ्या गमावल्या असताना युवकांना रोजगार पुरवून गुजरात आशेचा किरण बनत असल्याचा दावाही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App