विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी आपल्या लंडन दौऱ्यात भारतात लोकशाही नसल्याचा दावा करत जी भाषणे केली, त्या मुद्द्यावरून भाजपने त्यांना संसदीय पेचात पकडण्याची रणनीती आखली आहे. राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यासाठी भाजपने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. त्यांच्याविरुद्ध संसदीय समिती गठित करून कायदेशीर मार्गाने त्यांच्या संसद सदस्यत्वावर आक्षेप नोंदवून ते सदस्यत्व काही काळ निलंबित अथवा उर्वरित संपूर्ण काळासाठी निलंबित करण्याची भाजपने रणनीती आखली आहे.Congress MP KC Venugopal moves privilege motion against PM Narendra Modi for alleged derogatory remarks against Congress leader Sonia Gandhi and Rahul Gandhi
मात्र या रणनीतीला तोड म्हणून काँग्रेसने प्रतिरणनीती आखली असून काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लोकसभेत हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या भाषणात भारतीय लोकशाहीचा अपमान केला. मोदींचा विरोध करायला हरकत नाही, पण त्यांचा मोदीविरोध आता भारत विरोधात परावर्तित झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध संसदीय कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी भाजपने पावले उचलली आहेत.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यसभेत जो हक्कभंग प्रस्ताव दिला आहे, त्यामध्ये मोदींच्या एका जुन्या भाषणाचा हवाला त्यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेच्या भाषणात, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जर एवढे मोठे होते, तर त्यांचे आडनाव लावायला एक परिवार का घाबरतो आहे??, असा सवाल केला होता. नेहरूंचे नाव घेऊन असा सवाल करणे हा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा अपमान आहे. सोनिया आणि राहुल गांधी हे संसद सदस्य आहेत आणि राज्यसभेत म्हणजेच संसदेच्या पटलावर त्यांचा अपमान करणे हा हक्कभंग आहे, असा के. सी. वेणुगोपाल यांचा दावा आहे आणि त्यासाठीच त्यांनी राज्यसभा सभापतींकडे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे.
Congress MP KC Venugopal moves privilege motion against PM Narendra Modi for alleged derogatory remarks against Congress leader Sonia Gandhi and Rahul Gandhi pic.twitter.com/9COtzF6nX6 — ANI (@ANI) March 17, 2023
Congress MP KC Venugopal moves privilege motion against PM Narendra Modi for alleged derogatory remarks against Congress leader Sonia Gandhi and Rahul Gandhi pic.twitter.com/9COtzF6nX6
— ANI (@ANI) March 17, 2023
एकूण राहुल गांधींना भाजपने तयार केलेल्या संसदीय पेसातून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याचा हा काँग्रेसचा डाव आहे. आता दोन राष्ट्रीय पक्षांमधले हे कायदेशीर पेचप्रसंगाचे भांडण कुठपर्यंत पोहोचते आणि ते कसे वळण घेते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App