कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं!
विशेष प्रतिनिधी
कर्नाटक : जेडीएस नेते आणि हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची अश्लील सीडी समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. जेडीएससोबतच्या युतीवरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल करत आहेत, तर भाजप कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर प्रज्वल रेवण्णा यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचा आरोप करत आहे. Congress minister compared Prajwal Revanna with Lord Krishna
दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री रामाप्पा थिम्मापूर यांनी प्रज्वल रेवण्णा यांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. आता काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात खळबळ माजली आहे.
काय म्हणाले रामाप्पा?
विजयपुरा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्री रामाप्पा थिम्मापूर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “देशात या पेन ड्राईव्हच्या घटनेपेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही, असे दिसते की त्यांना या कामात विश्वविक्रम करायचा होता. प्रभू कृष्णाला सुद्धा अनेक बायका होत्या पण त्या भक्तीमुळे होत्या, पण प्रज्वलचे प्रकरण वेगळे आहे, त्याला कदाचित त्याचे नाव गिनीज रेकॉर्डमध्ये समाविष्ट करावे लागेल.
काँग्रेस मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजप आक्रमक झाला आणि त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मंत्र्याने माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. मात्र, निवडणुकीच्या वातावरणातील परिस्थितीचे गांभीर्य समजून काँग्रेस पक्षाने याला मंत्र्यांचे वैयक्तिक वक्तव्य म्हणत त्यापासून स्वत:ला अलिप्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App