वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 1984च्या शीख दंगलीशी संबंधित दिल्लीतील सुलतानपुरी येथील 3 जणांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांची राऊस एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 1984 च्या शीख दंगलीत सुलतानपुरी भागात 3 लोक मारले गेले होते. सुलतानपुरी दंगलीतील महत्त्वाच्या सीबीआय साक्षीदार चाम कौर यांनी सज्जन कुमार हे जमावाला भडकावत असल्याचा आरोप केला होता.Congress leader Sajjan Kumar acquitted in 1984 Sikh riots case; There was an allegation of murder of 3 people in Sultanpuri
जुलै 2010 मध्ये कडकडडुमा कोर्टाने सज्जन कुमार, ब्रह्मानंद, पेरू, कुशल सिंग आणि वेद प्रकाश यांच्यावर तीन जणांच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चित केले होते. तब्बल 13 वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणातील सज्जन कुमार आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात आरोप निश्चित
शीख दंगलीशी संबंधित जनकपुरी आणि विकासपुरी येथील शिखांच्या हत्येप्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने सज्जन कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले होते. मात्र, न्यायालयाने सज्जन कुमार यांच्यावरील हत्येचे कलम 302 हटवले होते.
सज्जन कुमार भोगत आहेत जन्मठेपेची शिक्षा
दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. खरं तर, 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर दिल्लीत पाच शीख मारले गेले आणि एक गुरुद्वारा जाळण्यात आला. या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळला आणि त्यांना शिक्षा झाली.
शीखविरोधी दंगल म्हणजे काय
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल उसळली होती. पंजाबमधील शीख दहशतवादाला दडपण्यासाठी इंदिरा गांधींनी शीखांचे पवित्र धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिर संकुलात ऑपरेशन ब्लूस्टार सुरू केले होते, त्यात दहशतवादी भिंद्रनवालासह अनेक लोक मारले गेले होते. या घटनेमुळे शीख संतप्त झाले.
काही दिवसांनी इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून देशभरात शीखविरोधी दंगली सुरू झाल्या. त्याचा सर्वाधिक परिणाम दिल्ली आणि पंजाबमध्ये दिसून आला. या दंगलीत सुमारे साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App