वृत्तसंस्था
भोपळ : सत्तेच्या कैफात अनेक बडे बडे नेते बुडतात आणि गुर्मीत काही बाही बोलून जातात… असेच एक बोल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांच्या तोंडी आले आहेत. अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यांनी कान उघडून ऐकावे. 8 महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात निवडणुका आहेत. 8 महिन्यानंतर तुमचा सगळा हिशेब घेतला जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी धमकीच कमलनाथ यांनी निवार मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात दिली आहे. Congress leader kamalnath threatens government officials, workers and police everybody will have to pay the price of their deeds
मध्यप्रदेशातील निवडणूक ही काही केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची निवडणूक नाही की मध्य प्रदेशातल्या आगामी पिढीसाठी महत्त्वाची आहे देशात संविधानावर आक्रमण केले जात असताना होणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करून ही निवडणूक लढवावी असे आवाहन करताना कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील सरकारी अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यांना हिशेब घेण्याची धमकी दिली आहे.
याआधी टीकमगढ मध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कमलनाथ यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे काय फार मोठे तोफ नाहीत. ते जर फार मोठे तोफ असते तर ग्वाल्हेर आणि मोरैनाच्या महापौर पदाची निवडणूक भाजप का हरला?, असा खोचक सवाल कमलनाथ यांनी केला होता.
#WATCH 8 महीने में चुनाव है। अधिकारियों और पुलिस को कह दीजिएगा कि 8 महीने में हम आपसे हिसाब लेंगे। सभी कर्मचारी और पुलिस के लोग कान खोलकर सुन लें कि उनका अच्छा हिसाब लिया जाएगा: कांग्रेस नेता और पूर्व CM कमलनाथ, निवारी (20.01) pic.twitter.com/xgEKxcIx25 — ANI_HindiNews (@AHindinews) January 22, 2023
#WATCH 8 महीने में चुनाव है। अधिकारियों और पुलिस को कह दीजिएगा कि 8 महीने में हम आपसे हिसाब लेंगे। सभी कर्मचारी और पुलिस के लोग कान खोलकर सुन लें कि उनका अच्छा हिसाब लिया जाएगा: कांग्रेस नेता और पूर्व CM कमलनाथ, निवारी (20.01) pic.twitter.com/xgEKxcIx25
— ANI_HindiNews (@AHindinews) January 22, 2023
कमलनाथांचे ट्रॅक रेकॉर्ड
कमलनाथ ट्रॅक रेकॉर्डही अशा धमकी भरल्या भाषणांनी आणि कृतींनीच भरले आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. दिल्लीत ते अनेकदा संजय गांधी यांच्याबरोबर विविध राजकीय कारवायांमध्ये भाग घ्यायचे. केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात हस्तक्षेप करायचे. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिखांविरुद्ध हिंसाचार घडविण्यासाठी चिथावणी देण्याचाही कमलनाथ, जगदीश टायटलर, एचकेएल भगत, सज्जन कुमार या नेत्यांवर आरोप आहे. याची सुनावणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्षे सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App