कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या नेते डी. के. शिवकुमार भारतातले सर्वात श्रीमंत आमदार 1413 कोटींची संपत्ती!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे भारतातले सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत त्यांची चौदाशे तेरा कोटी रुपयांची संपत्ती जाहीर झाली आहे. त्या उलट पश्चिम बंगाल मधील निर्मल कुमार धारा हे भाजप आमदार फक्त 1700 रुपयांची संपत्ती बाळगून आहेत. टॉप टेनच्या श्रीमंत आमदारांच्या यादीत पराग शहा आणि मंगल प्रभात लोढा या दोन महाराष्ट्रातल्या आमदारांचा ही समावेश आहे. Congress leader D. K. Shivkumar is India’s richest MLA with a wealth of 1413 crores

ADR report नुसार देशातल्या आमदाराची सरासरी संपत्ती 13.63 कोटी रुपयांची आहे. पण यातले वैशिष्ट्य असं की ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत त्यांची सरासरी संपत्ती 16.36 कोटी रुपयांची आहे, तर ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले नाहीत त्या आमदारांची सरासरी संपत्ती 11.45 कोटी रुपयांची आहे.

(ADR) अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेसी या संस्थेने हा रिपोर्ट जारी केला आहे.

भारतातल्या 28 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 4001 आमदारांच्या व्यापक अभ्यासानंतर हा रिपोर्ट तयार केला आहे.



 

या रिपोर्टनुसार :

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. याउलट पश्चिम बंगालमधील भाजपच्या एका आमदाराकडे केवळ 1700 रुपयांची संपत्ती आहे. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे 4 आणि भाजपचे 3 आमदार आहेत.

सर्वाधिक संपत्तीधारक टॉप 10 आमदार

डीके शिवकुमार (INC) – कनकापुरा, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता : रु. 1,413 कोटी केएच पुट्टास्वामी गौडा (IND) – गौरीबिदानूर, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 1,267 कोटी प्रियकृष्ण (INC) – गोविंदराजनगर, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 1,156 कोटी एन चंद्राबाबू नायडू (टीडीपी) – कुप्पम, आंध्र प्रदेश 2019 – एकूण मालमत्ता: 668 कोटी रुपये जयंतीभाई सोमाभाई पटेल (भाजप) – मानसा, गुजरात 2022 – एकूण मालमत्ता: 661 कोटी रुपये सुरेशा बीएस (INC) – हेब्बल, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 648 कोटी वायएस जगन मोहन रेड्डी (वायएसआरसीपी) – पुलिवेंदला, आंध्र प्रदेश 2019 – एकूण मालमत्ता: रु 510 कोटी पराग शहा (भाजप) – घाटकोपर पूर्व, महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: रु 500 कोटी टी.एस. बाबा (INC) – अंबिकापूर, छत्तीसगड 2018 – एकूण मालमत्ता : रु 500 कोटी मंगलप्रभात लोढा (भाजप) – मलबार हिल, महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: 441 कोटी रुपये

सर्वात कमी संपत्तीधारक टॉप 10 आमदार

निर्मल कुमार धारा (भाजप) – इंडस (SC), पश्चिम बंगाल 2021 – एकूण मालमत्ता: रु. 1,700 मकरंदा मुदुली (IND) – रायगडा, ओडिशा 2019 – एकूण मालमत्ता: रु 15,000 नरिंदर पाल सिंग सावना (आप) – फाजिल्का, पंजाब 2022 – एकूण मालमत्ता: रु. 18,370 नरिंदर कौर भाराज (आप) – संगरूर, पंजाब 2022 – एकूण मालमत्ता: रु. 24,409 मंगल कालिंदी (JMM) – जुगसलाई (SC), झारखंड 2019 – एकूण मालमत्ता: 30,000 रुपये पुंडरीकाक्ष्य साहा (AITC) – नवद्वीप, पश्चिम बंगाल 2021 – एकूण मालमत्ता: 30,423 रुपये राम कुमार यादव (INC) – चंद्रपूर, छत्तीसगड 2018 – एकूण मालमत्ता: 30,464 रुपये अनिल कुमार अनिल प्रधान (एसपी) – चित्रकूट, उत्तर प्रदेश 2022 – एकूण मालमत्ता: 30,496 रुपये राम डांगोरे (भाजप) – पंधाना (ST), मध्य प्रदेश 2018 – एकूण मालमत्ता: 50,749 रुपये विनोद भिवा निकोले (CPI(M))- डहाणू (ST), महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: रु 51,082

Congress leader D. K. Shivkumar is India’s richest MLA with a wealth of 1413 crores

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात