मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!

करौली येथील घटनेचा उल्लेख करत रविशंकर प्रसाद यांचा थेट सोनिया गांधींना सवाल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना देशाला हादरवणारी आहे. या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पावले उचलली आहेत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारला केली आहे. BJPs reply to the opponents who are trying to politicize on incidents in Manipur

दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान मोदींनीही दोषींना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. मणिपूरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी याप्रकरणी सरकारची बाजू मांडली आहे. यासोबतच प्रसाद यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, “मणिपूरची घटना दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आम्हाला संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावर चर्चा हवी होती. आमच्या सरकारला बहिणी-मुलींच्या सुरक्षेची काळजी आहे. मग तो कोणत्याही राज्याचा विषय असो त्याने काही फरक पडत नाही. आम्ही मणिपूरवर चर्चा करण्यास तयार होतो. मात्र विरोधकांना या घटनेची चिंता नसून कोणत्या कलमाखाली चर्चा करायची याची चिंता आहे. चर्चा झाली असती तर मणिपूरमध्ये सकारात्मक संकेत मिळाले असते.” रविशंकर प्रसाद यांनीही आपला मुद्दा ठाम ठेवण्यासाठी पेगासस हेरगिरी प्रकरणाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “या प्रकरणातही तेच झाले आहे. राहुल गांधी परदेशात बोलतात की आमची हेरगिरी केली जात आहे, पण तपासासाठी मोबाईल दिला नाही. या लोकांचा हेतू स्पष्ट आहे.”

रविशंकर म्हणाले, “मणिपूरमधील परिस्थिती स्थिर आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.” तसेच, यावेळी रविशंकर प्रसाद यांनी जोधपूर घटनेचा उल्लेख करत त्यावरील मौनावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “अखेर, जोधपूरच्या घटनेवर एवढी मौन का? सोनिया गांधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी बोलल्या आहेत का? गेहलोत यांनी या प्रकरणी काही केले आहे का? प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि खरगे यांनी आतापर्यंत काहीही का सांगितले नाही? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी यावरही बोलावे.”

BJPs reply to the opponents who are trying to politicize on incidents in Manipur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात