एक – दोन कोटी मुसलमान मेले तरी चालतील, आम्ही तलवारीने मुकाबला करू!!; काँग्रेस नेते अजीज कुरेशींचे भडकाऊ फुत्कार!!


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी भडकाऊ बयानबाजी वाढत चालली आहे. असेच फुत्कार उत्तर प्रदेश, मिझोरामचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित कुरेशी यांनी काढले आहेत. मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. एक – दोन कोटी मुसलमान मेले तरी चालतील, पण आम्ही तलवारीने मुकाबला करू, असे उद्गार अजीज कुरेशी यांनी काढले. congress leader aziz qureshi statement

अजीज कुरेशी हे उत्तर प्रदेश आणि मिझोरामचे राज्यपाल होते. 1984 मध्ये मध्य प्रदेशातील सतना लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरही ते मध्य प्रदेशात काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेश आणि मिझोरामच्या राज्यपाल पदाची संधी दिली. पण 2015 मध्ये राज्यपाल पद सोडावे लागल्यानंतर अजीज कुरेशी यांची भडकाऊ बयानबाजी वाढली. त्यांनी मध्यंतरी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध देखील असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. पण काल त्यावर कडी करत त्यांनी थेट तलवारीची भाषा वापरली.

मुसलमानांवर देशात अत्याचार होत आहेत. काँग्रेस सकट सगळे पक्ष हिंदुत्वाची भाषा बोलतात. काँग्रेस तर जय गंगा मैया जय नर्मदा मैया अशा घोषणा देऊन हिंदुत्वाच्या मार्गाने चालली आहे. पक्ष कार्यालयात ते रामाची मूर्ती ठेवतात. “यह डूब मरने की बात है!!” काँग्रेसने नेहरूंचा धर्मनिरपेक्षतेचा वारसा सोडून दिला आहे, असे शरसंधान अजीज कुरेशी यांनी साधले.

प्रियांका गांधींनी मध्यप्रदेशात जय नर्मदा मैया म्हणत नर्मदेचे दर्शन घेतले होते. त्यावर चिडून अजीज कुरेशी यांनी काँग्रेसवर दुगाण्या झोडल्या. काँग्रेसकडून सगळी पदे उपभोगल्यानंतर आता काँग्रेस मधून जरूर काढून टाकावे, असे वक्तव्य त्यांनी केले.

मुसलमानांनी बांगड्या भरल्या नाहीत

काँग्रेस सकट सगळेच पक्ष मुसलमानांना आपले नोकर समजतात. ते मुसलमानांना नोकऱ्या देत नाही. पोलीस, सैनिक भरती मधून दूर लोटतात, तरी त्यांना मुसलमानांची मते हवी असतात. पण मुसलमानांनी त्यांना मते का द्यावी?? असा सवाल करून अजीज कुरेशी यांनी आता मुसलमानांच्या डोक्यावरून पाणी चालले आहे. मुसलमानांनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रसंगी समाजासाठी मुसलमान बलिदान करायलाही तयार आहेत. देशात 22 कोटी मुसलमान आहेत. एक – दोन कोटी मुसलमान समाजासाठी मेले तरी चालतील, पण आता आम्ही काही सहन करणार नाही. प्रसंगी तलवारीने मुकाबला करू अशी धमकी भरली भाषा अजीज कुरेशी यांनी वापरली.

congress leader aziz qureshi statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात