विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागील एक वर्षापासून मोदी सरकार काय करत होते. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सरकार पाडणे, आमदार खरेदी करून लोकशाही दुबळी करण्याच्याच प्रयत्नात केंद्र सरकार राहिले,Congress lashes on Modi govt. on vaccination program
सरकारच्या धोरणामुळे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपन्यांना १.११ लाख कोटी रुपयांचा नफा होईल अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले, देशात ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटाची लोकसंख्या जवळपास ७४.३५ टक्के म्हणजेच १०१ कोटी एवढी आहे. या लोकसंख्येला लशीचे प्रति व्यक्ती दोन डोस या प्रमाणे २०२ कोटी डोस लागतील.
लसीकरणाचा खर्च एक तर राज्य सरकारांना किंवा लोकांना स्वतःला करावा लागेल. यातून दोन्हीही लस उत्पादक कंपन्यांना १,११,१०० कोटी रुपयांचा नफा होईल. सुरजेवाला म्हणाले की
देशातील २८ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील असून ८१.३५ लोकसंख्येला अनुदानित दराने स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. या गरीब आणि वंचित जनतेला मोफत कोरोना प्रतिबंधक लस मिळणार की नाही?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App