कर्नाटकात मतदानापूर्वी काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्ष खरगे यांना बजावली नोटीस

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपला. आता 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावली आहे. सोनिया गांधींचे ‘सार्वभौमत्व’ विधान काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले होते. याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. Congress in trouble ahead of polls in Karnataka, Election Commission issues notice to party president Kharge

आता निवडणूक आयोगाने खरगे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे किंवा त्यांना दुरुस्त करण्यास सांगितले आहे. हे राजकीय पक्षांनी घेतलेल्या शपथेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. ECI ने खरगे यांना कर्नाटक राज्याच्या संदर्भात ‘सार्वभौमत्व’ या शब्दाचा संदर्भ देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टचे स्पष्टीकरण आणि सुधारणा करण्यास सांगितले आहे.

भाजप नेत्यांनी ट्विट करून केली तक्रार

8 मे 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र यादव, डॉ जितेंद्र सिंह, तरुण चुघ, अनिल बलूनी आणि ओम पाठक यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 6 मे 2023 रोजी रात्री 9:46 वाजता केलेल्या ट्विटकडे लक्ष वेधण्यात आले.



काँग्रेसच्या ट्विटमध्ये काय लिहिले?

‘सीपीपी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजी यांनी 6.5 कोटी कन्नडिगांना कठोर संदेश दिला: काँग्रेस कोणालाही कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमत्वाला किंवा अखंडतेला धोका निर्माण करू देणार नाही.’

पीएम मोदी म्हणाले होते- काँग्रेसकडून कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हैसूरच्या नांजनगुड येथील सभेत काँग्रेसच्या या ट्विटवर म्हटले की, या निवडणुकीत आता काँग्रेसच्या राजघराण्याने म्हटले आहे की त्यांना कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायचे आहे. कर्नाटकची sovereignty म्हणजे कर्नाटकचे सार्वभौमत्व. जेव्हा एखादा देश स्वतंत्र होतो तेव्हा त्याला सार्वभौम राष्ट्र म्हणतात. याचाच अर्थ काँग्रेस भारतापासून कर्नाटक वेगळे करण्याचा खुलेपणाने पुरस्कार करत आहे. तुकडे-तुकडे टोळीचा रोग काँग्रेसमध्ये एवढा वरपर्यंत पोहोचेल, असे वाटले नव्हते.

Congress in trouble ahead of polls in Karnataka, Election Commission issues notice to party president Kharge

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात