विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून आपला आणि भारत जोडो यात्रेचा टीआरपी वधारण्याचा प्रयत्न केला, पण याचा परिणाम उलटाच झाल्याचे काल दिवसभरात दिसले. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळाला तो प्रतिसादच सावरकरांवरील टीकेने डॅमेज होतो की काय ही भीती निर्माण झाली. त्यामुळे कंट्रोल साठी संजय राऊत पुढे सरकले आहेत. Congress image damaged due to Rahulji’s criticism of Savarkar
वाशिमच्या सभेत राहुलजींनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आधीच अडचणीत आली. उद्धव ठाकरेंनी आम्ही राहुलजींच्या मताशी सहमत नाही, असे सांगून वेळ मारून नेली. आपल्या टीकेचे बाण नेहमीप्रमाणे भाजपवर चालवले. पण उद्धवजींच्या या असहमतीचा राहुलजींवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सावरकरांचाच मुद्दा पुन्हा उगाळला. या मुद्द्यामुळे मनसे + भाजप + बाळासाहेबांची शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते काँग्रेसवर तुटून पडले.
पण मूळातच राहुलजींच्या अस्थानी वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते धास्तावल्याचे दिसले. काँग्रेसची आधीच महाराष्ट्रातली राजकीय स्थिती चौथ्या – पाचव्या क्रमांकाचा पक्ष अशी झालेली असताना आणि भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यात सावरकर हा विषय नसताना राहुल गांधींनी टीआरपी वधारण्याच्या नादात टीआरपी घसरवला, असे काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचे मत पडले.
त्यामुळे अखेर आज सकाळीच खुद्द संजय राऊतच त्या डॅमेज कंट्रोल साठी बाहेर आले. त्यांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा अप्रत्यक्ष इशारा राहुल गांधींना दिला. भारत जोडो यात्रेचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. यात सावरकर विषयाचा समावेश नाही. जे एकही दिवस तुरुंगात गेले नाहीत, ते सावरकरांच्या तुरुंगवासाविषयी बोलत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी त्यांना लगावला. सावरकरांच्या तुरुंगवासाची तुलना त्यांनी स्वतःच्या तुरुंगवासाशी केली. पण या सगळ्या राजकीय मशक्कतीत संजय राऊत यांनी सावरकरांचे समर्थन केले असले, तरी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला त्यांच्याच वक्तव्यामुळे झालेल्या डॅमेजचा कंट्रोल करायला ते पुढे आले हे मात्र लपून राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App