Shubhankar Sarkar : काँग्रेसने शुभंकर सरकार यांची पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती

Shubhankar Sarkar

अधीर रंजन चौधरी यांची जागा घेणार, काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी तत्काळ प्रभावाने नियुक्तीचे आदेश दिले आहेत.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : शुभंकर सरकार  ( Shubhankar Sarkar ) यांना पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शुभंकर सरकार यांची तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली. बंगालमधील काँग्रेस अध्यक्षपदी नव्या नियुक्तीमुळे शुभंकर सरकार यांना एआयसीसी सचिव पदावरून मुक्त करण्यात आले आहे.



शुभंकर सरकार पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांची जागा घेतील. बहारमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक पराभूत झाल्यानंतर चौधरी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

अधिर रंजन चौधरी यांचा टीएमसी उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरीही काही विशेष नव्हती. त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांनी निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Congress has appointed Shubhankar Sarkar as the state president of West Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात