हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांची सून किरण चौधरी यांनी मुलीसह पक्ष सोडला!

Congress faces a big blow in Haryana former chief minister Kiran Chaudhary joins hands with her party

आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही केले आहे जाहीर Congress faces a big blow in Haryana former chief minister Kiran Chaudhary joins hands with her party

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची सून किरण चौधरी आणि त्यांची मुलगी श्रुती चौधरी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. किरण आणि त्यांच्या मुलीने आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवले आहेत. आता आज त्या दोघीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आज सकाळी 10.30 वाजता भाजप मुख्यालयात किरण चौधरी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. किरण चौधरी यांनी आपल्या समर्थकांना दिल्ली गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खर्गे यांना लिहिलेल्या त्यांच्या स्वतंत्र राजीनामा पत्रांमध्ये, किरण चौधरी आणि श्रुती चौधरी या दोघांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांना लक्ष्य केले आणि आरोप केला की पक्षाचे राज्य युनिट “खासगी जहागीर” म्हणून चालवले जात आहे. श्रुती चौधरी या काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या कार्याध्यक्ष होत्या. हरियाणामध्ये या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भिवानी जिल्ह्यातील तोशाम येथील आमदार किरण चौधरी यांनी सांगितले की, त्या आणि श्रुती बुधवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हरियाणामध्ये भाजप आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची सून किरण चौधरी या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जातात. हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्या मंत्रीही होत्या.

Congress faces a big blow in Haryana former chief minister Kiran Chaudhary joins hands with her party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात