काँग्रेसने आतापर्यंत राज्यसभेचे 9 उमेदवार केले जाहीर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. बुधवारी सकाळी काँग्रेसने चार तर दुपारी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण या नावांमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमलनाथ यांचे नाव नसणे. मध्य प्रदेशातून काँग्रेसने कमलनाथ यांच्या जागी अशोक सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी अजय माकन, सय्यद नासिर हुसेन, जीसी चंद्रशेखर यांना कर्नाटकमधून तर रेणुका चौधरी आणि अनिल कुमार यादव तेलंगणातून उमेदवारी देण्यात आली आहे.Congress drops Kamal Naths name for Rajya Sabha elections
काँग्रेसचे मध्य प्रदेश युनिटचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शनिवारी सत्ताधारी भाजपामध्ये काँग्रेसे नेते सामील होण्याच्या प्रश्नाला अफवा असल्याचे म्हटले. प्रमोद कृष्णम यांच्यासारखे काँग्रेसचे सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतेवर कमलनाथ आचार्य पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘प्रत्येकजण स्वतंत्र आहे आणि कोणत्याही पक्षाशी बांधील नाही.’
राज्यसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला 15 राज्यांमधील 56 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, अनेक राज्यांत निवडणुकांची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे. नामांकनाची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतमोजणी होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App