82 टक्के हिंदू असलेल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणण्याची आवश्यकता काय??, हे आहेच हिंदू राष्ट्र!!, असे वक्तव्य करून कमलनाथ यांनी आपल्या उतरत्या राजकीय वयात मध्य प्रदेशात राजकीय भूकंप आणून दाखवला. पण बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमानंतर कमलनाथ यांना मतपरिवर्तनातून ही उपरती झाली की काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाची ही मध्य प्रदेशी चलाख आवृत्ती आहे??, हा सवाल त्यामुळे तयार झाला आहे!! Kamalnath admits bharat as hindu nation, create rattle in Congress politics
एकतर कमलनाथांनी आपल्या छिंदवाडा मध्ये बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री यांचे रामायणावर प्रवचन ठेवले होते, यातच ते सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळल्याचे दिसून आले. त्यांनी बागेश्वर बाबांचे तीन दिवसांचे प्रवचन ठेवले. या तिन्ही दिवशी ते स्वतः प्रवचनाला हजर राहिले. बागेश्वर बाबांची सगळी बडदास्त कमलनाथांचे पुत्र नकुलनाथ यांनी ठेवली. त्यामुळे काँग्रेस मधल्या कमलनाथ विरोधी गटात अस्वस्थता पसरली होतीच, पण तरी देखील ती बोलून दाखवण्याची हिंमत कोणी केली नाही आणि काँग्रेस हायकमांडने देखील कमलनाथांवर कोणता आक्षेप घेतला नाही. त्यामुळे कमलनाथांचा हुरूप वाढला आणि त्यांनी ज्या देशात 82% हिंदू आहेत, त्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणण्याची आवश्यकता काय आहे??, असे विचारत हे हिंदू राष्ट्र आहेच!!, असे सांगून टाकले.
बडा मासा हिंदुत्ववादाच्या गळाला
पण या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंपाला यात कमलनाथ यांचा सारखा बडा मासा हिंदुत्ववादाच्या गळाला लागला की काय?, हा विषय चर्चेला आला. पण त्या पाठोपाठ कमलनाथांनी सॉफ्ट हिंदुत्वाच्या आधारे शिवराज सिंह चौहानांना नव्याने आव्हान दिले, याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.*
मध्य प्रदेशात गेली 20 वर्षे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. पण त्यांचा एकछत्री अंमल नाही. कारण तिथे काँग्रेसही तितकीच प्रबळ आहे. केंद्रातले मोदी सरकार आणि स्वतः शिवराज सिंह यांचा प्रभाव असल्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसवर राजकीय दुष्परिणाम झाला. त्याला काँग्रेस हायकमांडच्या राजकीय अकर्तृत्वाची जोड मिळाली. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखा मोहरा भाजपच्या गळाला लागू शकला आणि काँग्रेसची वाढत चाललेली ताकद आयत्या वेळेला घटली. याचा राजकीय धडा कमलनाथांनी घेतला असेल का आणि त्यातून ते बागेश्वर बाबांच्या माध्यमातून सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळून पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या कामाला ते लागलेत का??, हा सवाल तयार झाला आहे.
तसे ते कामाला लागले असतील तर गैर मानण्याचे कारण नाही. कारण तो राजकीय व्यवहार आहे. पण त्याच वेळी काँग्रेसला मध्य प्रदेशातल्या राजकारणाचे हिंदूकरण झाले हे अप्रत्यक्षपणे मान्य करावे लागेल, याचेही ते निदर्शक आहे.
मध्य प्रदेश निवडणुकांवर परिणाम
बागेश्वर बाबा जातील तिथे हिंदू राष्ट्राची मागणी करतात. त्यांना कोणत्याही राजकीय पुढार्याचा मतदारसंघ वर्ज्य नाही. त्यामुळे त्यांनी कमलनाथांच्या छिंदवाडा मतदार संघात जाऊन हिंदू राष्ट्राची मागणी करून टाकली आणि आपण बागेश्वर बाबांचे भक्त आहोत, असे उघड सांगणाऱ्या कमलनाथांना त्यांची लाईन फॉलो करावी लागली. किंबहुना आपण ही लाईन फॉलो करणार आहोत हे सांगण्यासाठीच कमलनाथांनी राजकीय चातुर्य वापरत बागेश्वर बाबांचा कार्यक्रम छिंदवाड्यात घेतला आणि यातूनच त्यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेला मध्य प्रदेशी राजकीय हवा देऊन टाकली.
आता याचा परिणाम शिवराज सिंह चौहान विरुद्ध कमलनाथ या लढाईत नेमका कसा दिसून येतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण ते समजायला अजून काही महिने वाट पाहावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App