काँग्रेसने विरोधी ऐक्यासाठी निवडला राजीव गांधींच्या जन्मदिनाचा मुहूर्त
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांचे ऐक्य करायला सुरुवात केल्यानंतर जागे झालेल्या कॉंग्रेसने स्वतःचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातला दुसरा टप्पा आज पासून सुरू होत आहे. सोनिया गांधी यांनी 18 विरोधी पक्षांची संयुक्त बैठक आज बोलवली आहे. Congress drops AAP, Akali Dal, BSP from opposition unity meeting to be chaired by Sonia Gandhi
परंतु त्यातून दिल्लीतला सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि पंजाब मधला विरोधी पक्ष अकाली दल या दोन्ही पक्षांना काँग्रेसने निमंत्रण न देता बैठकीतून वगळले आहे तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला निमंत्रण दिले आहे परंतु त्या स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार नाही.
त्यामुळे “तीन” वगळून काँग्रेसचा हा विरोधी ऐक्याचा प्रयत्न आहे. आज राजीव गांधी यांचा जन्मदिवस आहे. त्याचे औचित्य साधून सोनिया गांधी यांनी विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी बैठक बोलावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु यातल्या अनेक पक्षांना राजीव गांधी या नावाची राजकीय ऍलर्जी आहे त्यामुळे काँग्रेसने अधिकृतरित्या या बैठकीच्या निमंत्रण पत्रात राजीव गांधी जयंतीचा उल्लेख टाळला आहे.
राजीव गांधी यांचा आज जन्मदिवस असला तरी विरोधी ऐक्याच्या बैठकीशी या विषय याचा काहीही संबंध नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले, तर मोदी सरकार विरोधात जे अनेक सामायिक मुद्दे आहेत त्या विषयांवर चर्चा होईल, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्या ऐक्य प्रयत्नाच्या बैठकीचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना पाठविण्यात आले आहे. या पैकी आजच्या वर्चुअल बैठकीला नेमके कोण हजर राहते?, यावर या बैठकीचे राजकीय महत्त्व ठरणार आहे. एकूण 18 राजकीय पक्षांची बैठक अपेक्षित आहे. पण किती पक्ष प्रतिसाद देतात हे काँग्रेसला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App