फुटीचा अजेंडा : मनमोहन सिंग म्हणाले होते, देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा; राहुल गांधी म्हणाले, आदिवासीच या देशाचे पहिले मालक!!

विशेष प्रतिनिधी

सिवनी : देशात सर्वत्र हिंदुत्वाचे वातावरण पसरले असताना त्याला छेद देण्यासाठी जातीय राजकारण पसरवून फुटीचा अजेंडा कायम ठेवण्याचे धोरण काँग्रेसने आखले आहे. याचेच प्रत्यंतर आज राहुल गांधींच्या सिवनीतील भाषणातून आले. Congress agenda of separatist, now rahul gandhi claimed adivasis are “first owners” of this country

मध्य प्रदेशात सिवनी मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी म्हणाले, या देशातले आदिवासी हेच देशाचे पहिले मालक आहेत. बाकीचे सगळे बाहेरून आले आहेत आणि त्यांनी आदिवासींचे हक्क हिरावले आहेत. वन, जमीन आणि पाणी याच्यावर आदिवासींचा पहिला हक्क आहे, पण केंद्रातले मोदी सरकार त्यांचा हा हक्क काढून घेऊन देशातल्या मूठभर उद्योगपतींना आदिवासींच्या जमिनी आणि पाणी वाटत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

देशात काँग्रेस प्रणित यूपीए सरकार अस्तित्वात असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी असेच विधान केले होते. या देशातल्या सगळ्या साधन संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, मग इतर लोक हक्क गाजवू शकतात, असे ते म्हणाले होते. मनमोहन सिंग यांच्या त्या वक्तव्यामुळे वरून त्यावेळी संपूर्ण देशभर प्रचंड राजकीय गदारोळ उठला होता. मनमोहन सिंग हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान असताना केवळ एकाच समुदायाबद्दल किंवा त्याच्या हक्काबद्दल एकतर्फी कसे काय बोलू शकतात??, असा सवाल त्यावेळी विचारला गेला होता. राहुल गांधींनी देखील आज सिवनीतल्या सभेत मनमोहन सिंग यांच्याच पावलावर वेगळ्या प्रकारचे पाऊल टाकून आदिवासींना या देशाचे पहिले मालक ठरविले. हा त्यांनी एक प्रकारे देशातल्या सर्व नागरिकांवर अन्याय आणि भेदभाव केला.

देशाची राज्यघटना देशातल्या नागरिकांविषयी कुठेच मालकी हक्क स्वरूपाने भाष्य करत नाही. उलट देशातल्या नागरिकांना हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल राज्यघटनेने साधला आहे. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर देशाचे राज्यघटना बदलणार, असे ढोल पिटणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी देशातल्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, त्याचबरोबर आदिवासी हे या देशाचे पहिले मालक आहेत, अशी वक्तव्ये करून स्वतःहून राज्यघटनेला हरताळ फासला आहे.

Congress agenda of separatist, now rahul gandhi claimed adivasis are “first owners” of this country

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात