विशेष प्रतिनिधी
लंडन: पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसने तत्कालीन प्रिन्स चार्ल्सचा ७०वा वाढदिवस त्यांच्या आवडत्या शाही आभूषणांच्या प्रदर्शनासह साजरा केला होता. या प्रदर्शनात भारतातून लुटलेल्या ब्रिटीश राजेशाहीशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच या आभूषणांची निवड करण्यात राजकुमारांच मोठा हात होता, अशीही माहिती समोर आले आहे. या आभूषणांमध्ये मूर्ती, पेंटिंग्ज व्यतिरिक्त, 19 पन्ना रत्नांनी जडलेल्या एका लांब सोन्याचा कंबरेच्या पट्ट्याचाही समावेश होता, एका भारतीय महाराजाने त्यांचा घोडा सजवण्यासाठी त्याचा वापर केला होता. तर या प्रदर्शनावरून ब्रिटनच्या राजघराण्यावर जोरदार टीका झाली, कारण त्याचा संबंध ब्रिटनच्या हिंसक भूतकाळाशी होता. असे असले तरी, ब्रिटिश राजघराण्याला आपल्या भूतकाळाचा अभिमान आहे. Colonial loot How did the British loot precious gems including Kohinoor from India
आता द गार्डियनने नुकतीच भारतीय उपखंडावर ब्रिटनच्या राजवटीसाठी जबाबदार असलेला सरकारी विभाग, इंडिया ऑफिसच्या अभिलेखागारातून ४६ पानांची फाइल शोधून काढली आहे. यामध्ये क्वीन मेरीच्या त्या आदेशाचा संदर्भ आहे, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटीश राजघराण्याला मिळालेल्या दागिन्यांच्या उत्पत्तीची चौकशी केली होती. 1912चा अहवाल सांगतो की कशाप्रकारे चार्ल्सच्या एमराल्ड बेल्टसह अनेक मौल्यवान दागिन्यांना विजयाचे प्रतीक म्हणून भारतातून ब्रिटनमध्ये नेले गेले आणि नंतर ते राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात देण्यात आले. त्या वस्तू आता ब्रिटिश राजघराण्याची मालमत्ता म्हणून राजाच्या मालकीच्या आहेत.
महाराजा रणजित सिंग यांना भेटायला गेले होते गव्हर्नर जनरल –
अहवालात १८३७ मधील सोसायटी डायरिस्ट फॅनी इडन आणि त्यांचा भाऊ जॉर्ज यांच्या पंजाब भेटीचा उल्लेख आहे. ब्रिटिश राजवटीत जॉर्ज हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांनी लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंग यांची भेट घेतली, ज्यांनी सहा वर्षांपूर्वी ब्रिटिशांशी “मैत्रीचा करार” केला होता. इडनने आपल्या अहवालात लिहिले आहे की अर्धांध महाराजा रणजित सिंग यांनी फारच कमी मौल्यवान रत्ने परिधान केली होती, परंतु त्यांचे दल मौल्यवान रत्नांनी सजलेले होते. महाराजांकडे इतकी रत्ने होती की त्यांनी आपले घोडे एकापेक्षा एक मौल्यवान रत्नांनी सजवले होते. त्यांच्या सामानाची आणि निवासाच्या भव्यतेची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. याशिवाय फॅनी इडन यांनी नंतर त्यांच्या डायरीत असेही लिहिले होते की “आम्हाला हे राज्य लुटण्याची जर परवानगी मिळाली, तर मी थेट त्याच्या तबेल्यात जाईन”.
कोहिनूर हा महाराजा रणजित सिंग यांच्या मुलाकडून लुटण्यात आला होता –
या घटनेनंतर बारा वर्षांनी, महाराजा रणजित सिंग यांचा धाकटा मुलगा आणि वारस दुलीप सिंग याला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विजयी सैन्यासमोर पंजाबच्या विलनीकरणावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. या पराभवामुळे, त्याला पन्ना जडलेला पट्टा आणि सर्वात मौल्यवान कोहिनूर हिरा घोड्यांसह ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन करावे लागले. आज, कोहिनूर हिरा लंडनच्या टॉवरवर राणी एलिझाबेथच्या मुकुटात प्रदर्शित करण्यात आला आहे. आज हा हिरा राजेशाही इतिहासासोबतच ब्रिटनच्या जुलमी इतिहासाचे प्रतीक बनला आहे.
किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी ब्रिटन कोहिनूर दाखवणार नाही –
बकिंगहॅम पॅलेसला भारतातून लुटल्या गेलेल्या कलाकृतींच्या संवेदनशीलतेची स्पष्ट जाणीव आहे. भारत सरकारने ब्रिटनला असेही सांगितले आहे की किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणी कॅमिला यांना कोहिनूर जडलेला मुकुट घातल्याने वसाहतावादी भूतकाळातील वेदनादायक आठवणी जाग्या होतील. त्यानंतर राजवाड्याने त्याच्या जागी दुसरा हिरा आणणार असल्याचे जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App