देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या तुटवड्याची ओरड सुरू आहे. यावरून केंद्र व राज्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अतिवृष्टी हेही यामागील एक कारण आहे. अतिवृष्टीमुळे पुरवठा आणि उत्पादनात किंचित घट झाली. दुसरे कारण म्हणजे आयात केलेल्या कोळशाची किंमत खूप जास्त झाली आहे. Coal Crisis union coal minister prahlad joshi said we had asked states to increase coal stock but they did not
प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या तुटवड्याची ओरड सुरू आहे. यावरून केंद्र व राज्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान भाजप नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील वीज संकटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. राज्याने 2800 कोटी रुपये थकीत ठेवल्याने अंधारात जाण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. आता केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एबीपी न्यूज’शी या परिस्थितीबाबत संवाद साधला. ते म्हणाले की, जास्त पाऊस हे यामागील एक कारण आहे. अतिवृष्टीमुळे पुरवठा आणि उत्पादनात किंचित घट झाली. दुसरे कारण म्हणजे आयात केलेल्या कोळशाची किंमत खूप जास्त झाली आहे.
केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, “मला कोणताही आरोप करायचा नाही पण आम्ही राज्यांना जानेवारी ते जुलै या कालावधीत आमच्याकडून कोळसा घेऊन साठा वाढवण्याची विनंती केली होती, कारण पाऊस पडल्यावर कठीण होऊन बसते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांना पैसे द्यावे लागत असले तरी कोळसा क्रेडिटवरही उपलब्ध झाला असता.” ते म्हणाले की, दररोज पाठवला जाणारा कोळसा सुरू राहील. पुढील 15-20 दिवसांत स्टॉक वाढण्यास सुरुवात होईल. अनेक राज्यांमध्ये बंदिस्त कोळसा खाणी आहेत, त्यांनी त्यांचा वापर केला नाही.
प्रल्हाद जोशी म्हणाले की, आयातीत कोळशाची किंमत सुमारे 60 डॉलर प्रति टन होती, जी आता सुमारे 190 ते 200 डॉलर प्रति टन झाली आहे. आयातीत वीजनिर्मिती केंद्रांद्वारे निर्माण होणारी 30 ते 35 टक्के वीज बंद आहे. यासह ते म्हणाले की, आम्ही दोन दिवसांसाठी 19 लाख टनांपेक्षा जास्त कोळसा देत आहोत, जे मागणीपेक्षा जास्त आहे. 21 ऑक्टोबरपासून 20 लाख टनांची मागणी झाली आहे, जी आम्ही देऊ.
केंद्रीय मंत्री म्हणाले, “काल आम्ही 1.94 दशलक्ष टन कोळसा पुरवठा केला आहे, हा इतिहासातील घरगुती कोळशाचा सर्वाधिक पुरवठा आहे. 15 ते 20 दिवस आधी कोळसा साठा कमी झाला होता, पण काल कोळसा साठा वाढला आहे. मला खात्री आहे, कोळशाचा साठा वाढेल, घाबरण्याची परिस्थिती नाही.”
Coal Crisis union coal minister prahlad joshi said we had asked states to increase coal stock but they did not
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App