प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या तपासाची धग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी सीबीआय आज त्यांची चौकशी करणार आहे. केजरीवाल रविवारी प्रथमच केंद्रीय अन्वेषण विभागासमोर मद्य धोरण प्रकरणी चौकशीसाठी हजर होणार आहेत. तपास यंत्रणेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या समन्सवरून राजकारण तापले आहे.CM Kejriwal to appear in CBI office today for questioning, BJP agitation at Rajghat, read details…
अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष उतरले आहेत, तर भाजप याप्रकरणी केजरीवालांवर सातत्याने हल्लाबोल करत आहे.
सीबीआयचे अधिकारी आज सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहेत. यादरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आम आदमी पक्षाचे मंत्री आणि खासदार त्यांच्यासोबत सीबीआय मुख्यालयात जातील. केजरीवाल यांना शुक्रवारी समन्स प्राप्त झाले, त्यानंतर त्यांच्या पक्षाने केंद्रातील सत्ताधारी भाजप अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘आप’च्या दर्जामुळे त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
भगवंत मान यांच्यासह अनेक नेते केजरीवाल यांच्यासोबत जाणार
आप नेते सौरभ भारद्वाज यांनी अधिकृत निवेदन जारी केले की सीबीआय मुख्यालयापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी राजघाटावर जात होते. मात्र पोलिस आयुक्तांनी भाजपला आंदोलनाची परवानगी दिली आहे. अरविंद केजरीवाल महात्मा गांधींच्या समाधीवर थोडावेळ थांबून सीबीआय मुख्यालयात जाणार होते. सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की, दिल्ली पोलीस ज्या प्रकारे भाजपच्या लोकांना राजघाटावर आंदोलनाला परवानगी देत आहेत, मला वाटतं की दिल्लीचे पोलीस आयुक्त शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. हे चुकीचे आहे, असे होऊ नये. यामुळे थेट संघर्ष निर्माण होईल आणि शांतता व्यवस्थेला बाधा येईल. पोलिसांनी अशा आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती.
ते म्हणाले की, सीएम केजरीवाल रविवारी सीबीआय मुख्यालयात पोहोचतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. दिल्ली सरकारचे सर्व मंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आमचे सर्व खासदार अरविंद केजरीवाल यांना समर्थन देऊन CBI मुख्यालयातून शांततेत निघतील.
सीबीआय कार्यालयाजवळ कलम 144 लागू
दिल्ली पोलिसांनी सीबीआय मुख्यालयात आणि आजूबाजूला कलम 144 लागू केले आहे, कोणत्याही निदर्शनास परवानगी दिली जाणार नाही. दिल्ली पोलीस रविवारी सकाळपासून अलर्ट मोडवर असतील. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून कोणत्याही कार्यकर्त्याला नवी दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. नवी दिल्ली जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिस बॅरिकेड लावून तपासणी केल्यानंतरच वाहनांना प्रवेश दिला जाईल. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले जाऊ शकते. सीबीआय मुख्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलीस बॅरिकेड्स असतील. ओळखपत्रानंतरच प्रवेश दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App