Delhi Unlock : दिल्लीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. देशाच्या राजधानीतील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाऊन हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, कोरोना संसर्ग मोठ्या प्रयत्नाने नियंत्रित करण्यात आला आहे, परंतु अद्याप संपूर्ण लढाई जिंकलेली नाही. CM Kejriwal announces To Delhi Unlock, Construction, factories to start
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. देशाच्या राजधानीतील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाऊन हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, कोरोना संसर्ग मोठ्या प्रयत्नाने नियंत्रित करण्यात आला आहे, परंतु अद्याप संपूर्ण लढाई जिंकलेली नाही.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील लॉकडाऊन हळूहळू उघडण्यात येईल. सर्वप्रथम समाजातील गरीब वर्ग, मजूर, स्थलांतरित लोकांची काळजी घेण्यात येत आहे. सोमवारपासून बांधकाम व कारखान्यांचे कामकाज सुरू होईल. पुढील आठवड्यात ही दोन्ही क्षेत्रे खुली असतील.
.. अन्यथा दिल्लीला पुन्हा लॉकडाउन
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता आम्ही लॉकडाउन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, आठवड्यांनंतर जनतेच्या सूचना आणि अभिप्राय घेऊन जर कोरोना पुन्हा वाढू लागला, तर अनलॉक करण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल. कोरोनाशी संबंधित सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला आवाहन करताना म्हटले की, सर्वांना मदतीची गरज आहे, आपण नियम पाळले तरच दिल्लीतील सर्व आर्थिक कामे खुली होतील, जर कोरोना पुन्हा वाढू लागला तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका, ही वेळ अतिशय नाजूक आहे, आपण सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीचे रक्षण करू आणि देश वाचवू शकतो. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करू नका, आवश्यक नसल्यास घर सोडू नका.
CM Kejriwal announces To Delhi Unlock, Construction, factories to start
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App