लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

एक नक्षलवादी ठार, शस्त्रांसह अन्य साहित्य जप्त


विशेष प्रतिनिधी

कांकेर : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी छत्तीसगडमधील कांकेरमध्ये पोलिस नक्षलवादी चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. काकनारच्या जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी गणवेशधारी नक्षलवाद्याला ठार केले आहे. जवानांनी घटनास्थळावरून ठार झालेल्या माओवाद्यांच्या मृतदेहासह शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.Clashes between Naxalites and security forces in Chhattisgarh ahead of Lok Sabha elections



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत. परिसरात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. या मालिकेत डीआरजी आणि बीएसएफची संयुक्त टीम कोयलीबेरा पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प चिलपारस येथून नक्षल ऑपरेशनसाठी रवाना झाली होती.

दरम्यान, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काकनार गावच्या जंगलात पोलिस दल आणि निक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंच्या या प्रदीर्घ चकमकीत एक गणवेशधारी माओवादी जवानांनी मारला. परिसरात झडती घेतली असता, ठार झालेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह, एक स्टेनगन, स्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

सध्याही पोलीस दल, बीएसएफ, डीआरजीकडून आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे. या प्रकरणात, पोलीस चकमकीशी संबंधित तपशीलवार माहिती आरओला शेअर करण्याची शक्यता आहे.

Clashes between Naxalites and security forces in Chhattisgarh ahead of Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात