विशेष खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना विशेष खंडपीठाकडे जाण्यास सांगितले आहे. ईडीच्या अटकेला अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.CJI Chandrachuds bench did not hear Kejriwals plea
केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी न्यायालयात हजर झाले. केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यांना न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या विशेष खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश दिले.
CJI म्हणाले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे विशेष खंडपीठ आजच तुमच्या प्रकरणावर सुनावणी करेल. यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी यांनी सीजेआयसमोर याचिकेचा उल्लेख केला होता आणि या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर तुम्ही तुमचे म्हणणे मांडावे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App