कुत्र्यासारखे वफादार बूथ अध्यक्ष निवडा; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा न्याय संकल्प यात्रा कार्यकर्त्यांना सल्ला!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “इंडिया” आघाडीतले सगळे प्रादेशिक घटक पक्ष काँग्रेसला धुत्कारत असताना काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडची भाषा मात्र अजूनही सुधारत नाही. उलट ती आणखीन आणखीन घसरत असल्याची चिन्हे त्यांच्याच भाषणातून दिसत आहेत.Choose a booth president as loyal as a dog; Congress president Mallikarjun Kharge’s advice to Nyaya Sankalp Yatra activists!!

काँग्रेसच्या न्याय संकल्प यात्रेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी असाच एक उद्धट सल्ला दिला. बुथ अध्यक्ष निवडताना तुम्ही कुत्र्यांसारखे वफादार बुथ अध्यक्ष निवडा, असा सल्ला मल्लिकार्जुन खरे यांनी दिला. दिल्लीत काँग्रेसच्या न्याय संकल्प यात्रेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आपण जनावरांच्या बाजारात कुत्रा किंवा कुठले जनावर खरेदी करायला जातो, तेव्हा त्याचा कान उचलून बघतो. त्याचे दात मोजतो. म्हणजे आपण त्याची चांगली परीक्षा घेऊनच खरेदी करतो तुम्ही देखील बुथ अध्यक्ष निवडताना तसेच निकष लावा. कुत्र्यासारखे वफादार अध्यक्ष निवडा, तरच ते तुमची कामे करतील.



मल्लिकार्जुन खर्गे यांचा हा अजब सल्ला ऐकून काँग्रेसच्या न्याय संकल्प यात्रेचे कार्यकर्तेही हबकले. आपलेच अध्यक्ष आपल्याच कार्यकर्त्यांना नेमके कोणत्या शब्दांमध्ये संबोधत आहेत आणि आपण “तसे” आहोत का?? असा प्रश्न त्यांना पडला.

एकीकडे “इंडिया” आघाडीतले सगळेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसला धुत्कारत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेण्याची भाषा वापरणे किंवा आपल्याच कार्यकर्त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगणे हे तर सोडाच, खुद्द काँग्रेस अध्यक्षच आपल्या कार्यकर्त्यांना जनावरांच्या बाजारातली कुत्र्या मांजरीसारखे जनावरे संबोधून कुत्र्यासारखा वफादार बूथ अध्यक्ष निवडायला सांगत आहेत, हा काँग्रेस मधला सध्याचा नवा “न्याय संकल्प” आहे!!

Choose a booth president as loyal as a dog; Congress president Mallikarjun Kharge’s advice to Nyaya Sankalp Yatra activists!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात