विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिमालयन योगींच्या सांगण्यावरून राष्ट्रीय शेअर बाजार (Natiional Stocl Exchange) चालवणाऱ्या NSE च्या माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. Chitra Ramakrishna arrested in co-location scam
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामकृष्ण यांना दिल्लीत अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. नंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. चित्रा रामकृष्ण यांना सोमवारी कोर्टात हजर केले जाईल. जेथे सीबीआय पुढील चौकशीसाठी कोठडी मागणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने सलग तीन दिवस रामकृष्ण यांची चौकशी केली आणि त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्या योग्यरित्या प्रतिसाद देत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते म्हणाले की केंद्रीय तपास एजन्सीने सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील वरिष्ठ मानसशास्त्रज्ञाची सेवा देखील घेतली होती, त्यांनी त्यांची चौकशी देखील केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मानसशास्त्रज्ञही या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की एजन्सीकडे त्यांना अटक करण्याशिवाय पर्याय नव्हता.
एक दिवसापूर्वी, विशेष सीबीआय न्यायालयाने माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांना मोठा धक्का दिला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) को-लोकेशन प्रकरणात शनिवारी कोर्टाने त्यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. चित्रा यांच्यावर हिमालयन योगी यांच्या सांगण्यावरून राष्ट्रीय शेअर बाजार चालवल्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात, CBI ने NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम यांना त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानातून अटक केली होती आणि दावा केला होता की तेच हिमालयन योगी आहेत. आनंद सुब्रमण्यम यांच्यावर एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.
यासोबतच ते एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सल्ला द्यायचे आणि ती त्यांच्या इशाऱ्यावर काम करायची. चित्रा रामकृष्णा एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत NSE च्या MD आणि CEO होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App