वृत्तसंस्था
बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला. हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे. स्पेसवॉक करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. Chinese astronauts at the space station for a six month stay
झाई झियांग (५५), वँग यापिंग (४१), ये गुआंगफू (४१), अशी त्याची नावे आहेत. वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे. झाई यांनी सांगितले, की ‘‘अवकाश स्थानकात सहा महिने गुरूत्वाशिवाय राहणे आव्हानात्मक आहे. कारण त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो.’’ हे अवकाशवीर अवकाश औषधे व भौतिकशास्त्रातील प्रयोग करणार असून स्पेसवॉक करण्याचा त्यांचा विचार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App