विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लडाखमध्ये हॉवित्झर तोफा तैनात केल्यावर चीनच्या कारवाया थांबल्या आहेत. त्यामुळे आता चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उंच ठिकाणी आणखी हॉवित्झर तोफा तैनात करण्याचे लष्कराने ठरविले आहे. यासाठी २०० हॉवित्झर तोफा विकत घेतल्या जाणार आहेत.China’s border will be tighter, howitzers will be deployed at higher ground
हॉवित्झर तोफांचा निर्णय अत्यंत यशस्वी झाली. त्यामुळे आता उत्तराखंडसह सिक्किमी आणि अरुणाचल प्रदेशातही सीमेवर या तोफा तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कराने केलेल्या प्रात्यक्षिकात आढळूनआले आहे की या क्षेत्रात शस्त्रास्त्रे तातडीने पोहोचविणे शक्य आहे. त्यामुळे शत्रुला कडक उत्तर देता येऊ शकते.
नुकतेच लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले होते की वाळवंटात आणि मैदानी प्रदेशात हॉवित्झर तोफांचा वापर होतो. मात्र, चीनबरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता पहाडी प्रदेशातही या तोफांचा उपयोग व्हावा यासाठी त्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
लडाखमध्ये चीनी आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी अतिथंड वातावरणातही तोफांचे काम पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी विशेष तंबू आणि सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. या तोफांची मारक क्षमता ३८ किलोमीटर आहे. परंतु, लडाखमध्ये १५ हजार फूट उंचीवर या तोफा ५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App