मुलांना शाळेत भगवे कपडे घालून येण्यापासून रोखले; तेलंगणात मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था

हैदराबाद : पोलिसांनी तेलंगणातील एका मिशनरी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी काही मुलांना भगवा परिधान करून शाळेत येण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. हैदराबादपासून 250 किमी अंतरावर असलेल्या मंचेरियल जिल्ह्यातील कन्नेपल्ली गावात ही घटना घडली. ब्लेस्ड मदर तेरेसा स्कूल असे शाळेचे नाव आहे.Children were prevented from coming to school wearing saffron; A case has been registered against the principal of a missionary school in Telangana

दांडेपल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे, आयपीसी कलम 153 (ए) (धर्म किंवा जातीच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि 295 (ए) (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



काय आहे प्रकरण…

शाळा व्यवस्थापनानुसार मंगळवारी काही मुले गणवेशाऐवजी भगवे कपडे घालून आली होती. मुख्याध्यापकांनी या मुलांना भगवे कपडे घालून येण्याचे कारण विचारले. मुलांनी उत्तर दिले की त्यांनी हनुमान दीक्षा घेतली आहे, जी त्यांना 21 दिवस पाळायची आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांना त्यांच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले.

या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये मुख्याध्यापकांनी भगवे कपडे घालून मुलांना शाळेत येण्यापासून रोखल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर जमावाने शाळेवर हल्ला केला. भगवे कपडे घातलेल्या काही लोकांनी शाळेच्या खिडक्यांवर दगडफेक केली.

यानंतर मुलांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि शाळेतील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जमावाने शाळा व्यवस्थापनाला माफी मागण्यास सांगितले. त्याचे फुटेजही शाळा व्यवस्थापनाने दिले आहे. जमावाने मुख्याध्यापकांना बेदम मारहाण केली आणि कपाळावर बळजबरीने टिळा लावल्याचा दावाही काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

Children were prevented from coming to school wearing saffron; A case has been registered against the principal of a missionary school in Telangana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात