भुशी डॅमची दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश; लोणावळ्यात सायंकाळी 6 वाजेनंतर पर्यटकांना नो एंट्री; नवीन नियमावली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅकवाटरला असलेल्या धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.Chief Minister’s order to administration regarding Bhushi Dam disaster; No entry for tourists after 6 pm in Lonavala; New regulations

लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळी संध्याकाळी 6 वाजेनंतर पर्यंटकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट आदेश दिले आहेत.



हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवााई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरुणी या भागात येतात. रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहोत, यासंदर्भात आम्हाला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आले असल्याचे दिवसे यांनी सांगितले.

लोणावळ्यातील पर्यटनासाठी नियमावली

लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करणार आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अपघात, पाण्यामध्ये तरुणाचा अतिउत्साह आणि व्हीडीओ आणि रिलीज या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.

Chief Minister’s order to administration regarding Bhushi Dam disaster; No entry for tourists after 6 pm in Lonavala; New regulations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात