माफिया अतिकने बळकवलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट मुख्यमंत्री योगींनी गरजूंना केले सुपूर्द!

आमचे सरकार गरिबांच्या पाठीशी उभे असल्याचेही योगींनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रयागराजला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लुकरगंजमधील माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर बांधलेल्या ७६ फ्लॅटच्या चाव्या गरजूंना सुपूर्द केल्या. Chief Minister Yogi handed over the flats built on the land seized by mafia Atik to the needy

मुख्यमंत्री योगी यांनी २० लाभार्थ्यांशी संवाद साधला. म्हणाले- आमचे सरकार गरिबांच्या पाठीशी उभे आहे, पण पूर्वी असे नव्हते. पूर्वीची सरकारे माफियांच्या पाठीशी उभी असायची. यापूर्वी शासनाकडून संरक्षण मिळाल्यानंतर जमिनींवर माफिया कब्जा करत असत. पण सध्याच्या सरकारमध्ये हे शक्य नाही.

मुख्यमंत्री योगींनी प्रयागराजमध्ये ७६८ कोटी रुपयांच्या २२६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी पीडीए अधिकाऱ्यांसमवेत फ्लॅटच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कॅबिनेट मंत्री नंद गोपाल नंदी उपस्थित होते.

Chief Minister Yogi handed over the flats built on the land seized by mafia Atik to the needy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात