Chief Minister Yogi : ‘महाकुंभाला मृत्युकुंभ म्हणणारे होळीच्यावेळी दंगली रोखण्यात अपयशी ठरले’,

Chief Minister Yogi

मुख्यमंत्री योगींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दिले चोख प्रत्युत्तर


विशेष प्रतिनिधी

गोरखपूर : Chief Minister Yogi  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या “मृत्यु कुंभ” विधानावर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “होळीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवू न शकलेल्यांनी प्रयागराजच्या महाकुंभाला ‘मृत्यु कुंभ’ म्हटले होते.”Chief Minister Yogi

गोरखपूर जर्नलिस्ट प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “पहिल्यांदाच तामिळनाडूमधून लोक आले होते. केरळमधूनही लोक आले होते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २५ कोटी आहे आणि होळी शांततेत साजरी झाली. पण, पश्चिम बंगालमध्ये होळीच्या वेळी अनेक दंगली झाल्या. होळी दरम्यान झालेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवू न शकलेल्यांनी प्रयागराजचा महाकुंभ ‘मृत्यु कुंभ’ असल्याचे म्हटले होते.



ते म्हणाले, “पण, आम्ही म्हटलं होतं की ते ‘मृत्यू’ नाहीये, ते ‘मृत्युंजय’ आहे. हे ‘महाकुंभ’ आहे. या कुंभमेळ्याने हे सिद्ध केले आहे की महाकुंभाच्या ४५ दिवसांत, दररोज पश्चिम बंगालमधील ५० हजार ते एक लाख लोक या कार्यक्रमाचा भाग होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे महाकुंभ “मृत्यु कुंभ” मध्ये रूपांतरित झाला आहे. महाकुंभातील मृतांची खरी आकडेवारी अधिकाऱ्यांनी दडपली असल्याचा दावा त्यांनी केला होता. पश्चिम बंगाल विधानसभेत भाषण करताना बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी शेकडो मृतदेह लपवले आहेत. भाजपच्या राजवटीत महाकुंभाचे मृत्युकुंभात रूपांतर झाले आहे.

Chief Minister Yogi gave a befitting reply to Chief Minister Mamata Banerjee

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात