दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावरही साधला आहे निशाणा
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला राजकीय वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय जनता पार्टीने विरोधी आघाडी ‘I-N-D-I-A’ विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. Chief Minister Shivraj questioned Sonia Gandhi on objectionable statements about Sanatan Dharma
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “ सनातन धर्म कोणीही नष्ट करू शकत नाहीत. हे मानसिक दिवाळखोर लोक आहेत, याचे उत्तर सोनिया गांधींनी द्यावे. ज्या लोकांसोबत त्यांनी ‘I-N-D-I-A’ ने आघाडी केली ते लोक सनातन धर्माचा अपमान करत आहेत.
मुख्यमंत्री शिवराज म्हणाले, “‘I-N-D-I-A’ आघाडीचे लोक सनातनची तुलना कधी डेंग्यूशी करतात, तर कधी अन्य आजाराशी करतात. सोनिया गांधी त्यांना पाठिंबा देतात का? दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांचे त्याला समर्थन आहे का? आणि जर त्यांनी पाठिंबा दिला नाही तर त्यांना आघाडीतून काढून टाका.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांनी आधी सनातन धर्माची तुलना मलेरिया, डेंगी, कोरोना या रोगांशी केली होती आणि त्याच्या निर्मूलनाची उद्धट भाषा वापरली होती. पण त्या पलीकडे जाऊन 2 G घोटाळ्यातला मुख्य आरोपी माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची डेंगी, मलेरिया, कोरोना या रोगांशी तुलना केली हे त्यांचे चुकले, कारण ते रोग वैयक्तिक आहेत. पण प्रत्यक्षात सनातन धर्म हा HIV, कुष्ठरोग यांच्यासारखा सामाजिक रोग आहे, असे बेलगाम उद्गार ए. राजा यांनी काढले आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघमची घसरण आणि मस्ती कमी न झाल्याचे ते निदर्शक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more