मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मराठवाड्यातील मान्सूनपूर्व परिस्थितीची आढावा बैठक

दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, चारा टंचाई संदर्भातही घेतला आढावा


विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, चारा टंचाई आणि मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी, चारा तसेच त्याची उपलब्धता याचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. सध्या ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होतो आहे, त्यांना अतिरिक्त पाण्याची अथवा चाऱ्याची आवश्यकता भासल्यास मागणी नोंदवल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले.Chief Minister Shinde held a meeting to review the pre-monsoon situation in Marathwada



यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मुख्य सचिव नितीन करीर, पालकमंत्री संदिपान भुमरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता, त्या माध्यमातून पुरेसा चारा उपलब्ध असल्याचे समजले. धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने त्याचा वापर विचारपूर्वक करावा तसेच पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन इतर वापर टाळावा, असे निर्देश दिले.

मान्सूनपूर्व परिस्थितीची तयारी करताना शहरातील नालेसफाई वेळेत पूर्ण करावी, ज्याठिकाणी वीजा चमकतात तिथे अँटी लायटनिंग डिव्हाईस बसवावे, शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावे तसेच अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश दिले.

Chief Minister Shinde held a meeting to review the pre-monsoon situation in Marathwada

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात