मुख्यमंत्री सरमा यांचा बंगाली भाषिक मुस्लिमांना सूचक इशारा!

आसाममधील मुस्लिम लोकसंख्येमध्ये दोन भिन्न गट आहेत


विशेष प्रतिनिधी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्थलांतरित बांगलादेशी वंशाच्या बंगाली भाषिक मुस्लिमांना राज्यातील मूळ रहिवासी होण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. सरमा यांनी शनिवारी बंगाली भाषिक मुस्लिमांना सांगितले की, जर त्यांना खरोखरच स्थानिक म्हणून ओळख मिळवायची असेल, तर त्यांना दोनपेक्षा जास्त मुले होणे थांबवावे लागेल. याशिवाय त्यांना बहुपत्नीत्वाची परंपरा सोडून मुलांना शाळेत पाठवावे लागणार आहे.Chief Minister Sarmas warning to Bengali speaking Muslims



वास्तविक, आसाममध्ये जम्मू आणि काश्मीरनंतर दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची संख्या 34 टक्के आहे. परंतु आसाममधील मुस्लिम लोकसंख्येमध्ये दोन भिन्न गट आहेत. यामध्ये एक गट बंगाली भाषिक आणि बांगलादेश वंशाच्या स्थलांतरित मुस्लिमांचा आहे, तर दुसरा गट आसामी भाषिक स्थानिक मुस्लिमांचा आहे. बंगाली भाषिक मुस्लिम लोकसंख्या बांगलादेशमार्गे आसाममध्ये आल्याचे सांगितले जाते.

बंगाली भाषिक मुस्लिमांना मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “त्यांनी दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालणे आणि बहुपत्नीत्व थांबवले पाहिजे. कारण ही आसामी लोकांची संस्कृती नाही. जर त्यांना मूलनिवासी व्हायचे असेल तर त्यांनी त्यांचा त्याग केला पाहिजे. अल्पवयीन मुलींशी लग्न करू शकत नाही.”

Chief Minister Sarmas warning to Bengali speaking Muslims

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात