आरोपीवर आरोपीचे नाव हबीबगंज पोलिसांच्या गुंडा लिस्टमध्येही आहे
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तत्काळ मोहन यादव यांनी कामाला सुरुवात केली आहे. एकापोठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेणे सुरू केले आहे.Chief Minister Mohan Yadav on Action Mode A bulldozer turned on the house of BJP worker who amputated his hand
सर्वप्रथम मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील अर्थातच मशिदींवरील लाऊड स्पीकरच्या अनिर्बंध वापरावर चाप लावण्याचा आणि खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानतंर त्यांनी मध्य प्रदेशातील गुन्हेगारीला वचक बसेल असा एक निर्णय दिला. भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर भूईसपाट केलं आहे.
भाजप कार्यकर्त्याचा हात कापणारा आरोपी फारूख राइन उर्फ मिन्नीच्या घरावर प्रशासनाचा बुलडोजर चालवण्याचा आदेश दिला गेला. यानंतर आरोपीच्या भोपाळमधील जनता कॉलिनीतील घरावर बुलडोजर चालवला गेला. आरोपी फारुख राइन याच्यावर भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर याचा हात कापल्याचा आरोप आहे.
आरोपी फारुखचे नाव हबीबगंज पोलिसांच्या गुंडा लिस्टमध्येही आहे. या अगोदरही त्याच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 5 डिसेंबर रोजी आरोपी फारुखने भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये देवेंद्र ठाकरू यांचा हात कापला गेल्याने, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App