विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी छोटे राजा साहेब म्हणत पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. छोटे राजा साहेब, ह्या पेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते असा सवाल त्यांनी विचारला आहे.Chhota Raja Saheb says Amrita Fadnavis targets Aditya Thackeray,
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. ‘छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते की नंबर वन सीएमच्या शहराला जगातील सर्वात वाईट वाहतूक नियोजन असलेले शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला जगातील वाईट ट्रॅफीक असलेल्या शहरांत पहिला क्रमांक मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जगात सर्वाधिक-65 % टक्के वाहतूक कोंडी असल्यामुळे मुंबई दरवर्षी 41,000 कोटींपेक्षाचे आर्थिक नुकसान सोसत आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा मी काही बोलते तेव्हा तुम्ही हे विसरुन जा की देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणून बोलते.
मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. मला दिसतं की, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे किती त्रास होतो. आज मुंबईत ट्रॅफिक जाम मुळे तीन टक्के घटस्फोट होतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे खड्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार नाहीत का?
अमृता फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले, ऐकावे ते नवलं. आज तर फारच मोठा जावईशोध लावला आहे की तीन टक्के घटस्फोट मुंबईतील वाहतूककोंडीमुळे होतात. त्यांच्यावर आता हसावं की रडावं? कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवणारच असं सुरू आहे.
अमृता फडणवीसांसह इतरानाही जो त्रास होत आहे तो खूपच वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच बदनाम करण्याचं काम भाजप करते. मुंबईकर या करमणुकीच्या कामाला कंटाळले आहेत. अशा वक्तव्यांमुळे मुंबईची बदनामी होते. वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होतात हा जावईशोध भयानक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App