Chhagan bhujbal सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या भीतीने अजितदादांना फुटलेला घाम ते ईडी पासून सुटका; सगळे दावे भुजबळांनी फेटाळले!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्यात सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या भीतीने अजितदादांना फुटलेला घाम ते ईडी पासून स्वतःची सुटका, हे सगळे दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले. राजदीप सरदेसाई यांनी आपल्या नव्या पुस्तकात हे दावे केले. मात्र छगन भुजबळांनी ते फेटाळून लावले. Chhagan bhujbal

विधानसभा निवडणुकीच्या ऐन मध्यात राजदीप सरदेसाई यांचे 2024 लोकसभा निवडणुकांसंदर्भातले पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात छगन भुजबळांच्या मुलाखतीच्या रूपाने अनेक दावे सरदेसाई यांनी केले. या सगळ्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. यातून सगळा अंगुली निर्देश भाजपच्या बदनामीकडे राहिला. त्यावर संजय राऊत, सुप्रिया सुळे वगैरे नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करून भाजपला टार्गेट केले.

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात केलेले सगळे दावे फेटाळले. उलट पुस्तकाच्या प्रकाशनाच्या हेतूविषयी संशय व्यक्त करून निवडणुकीनंतर पुस्तकावर कायदेशीर कारवाई करायचे सूतोवाच देखील भुजबळानी केले.

जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्यात सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते. कारण ते सगळे व्यवहार अजितदादांनी सुनेत्रा पवारांच्या नावावर केले होते, हे अजितदादांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अजितदादांना घाम फुटला होता. प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रीग केल्यानंतर ईडीने त्यांच्या सीजे हाऊस या इमारतीचे चार मजले सील केले होते. त्यानंतर सगळे नेते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांना भाजपबरोबर येण्याची विनंती केली. परंतु पवारांनी ती फेटल्यानंतर अजितदादांनी स्वतंत्र निर्णय घेतला, असा दावा भुजबळांनी केल्याचे राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात नमूद केले. त्याचबरोबर ईडी पासून सुटका झाली, हा माझा पुनर्जन्म होता, असे वाक्यही छगन भुजबळ यांच्या तोंडी घातले.

भुजबळांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातले सगळे दावे फेटाळले, पण भुजबळांची पत्रकार परिषद होईपर्यंत जी काही भाजपची बदनामी व्हायची होती, ती होऊन गेली. त्यामुळे भुजबळांच्या पत्रकार परिषदेच्या हेतू विषयी देखील शंकाच निर्माण झाली.

Chhagan bhujbal rejects claims made by rajdeep sardesai in his new book

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात