विशेष प्रतिनिधी
पाटणा : देशात कॉँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोात बोलताना कॉँग्रेसच्या तेलंगणा प्रदेशाध्यक्षाची जीभ घसरली आहे. बिहारी जनतेबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे बिहारमध्ये संताप व्यक्त होत आहे.Chandrasekhar Rao’s DNA completely Bihari, Congress state president’s controversial statement angers Bihar
तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी म्हणाले, तेलंगणामधील उच्च पदांवर कार्यरत असलेले मूळचे बिहारचे आयएएस अधिकारी आपल्याला पसंत नाहीत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा डीएनए पूर्णपणे बिहारी झाला आहे, कारण बिहारचेच अधिकारी संपूर्ण राज्य चालवित आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
बिहारी जनतेबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे बिहारमध्ये संताप व्यक्त हो तआहे. कॉँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलासह सुंक्त जनता दलासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. बिहारचे मंत्री संजय झा यांनी म्हटले आहे की, बिहार ही ज्ञानाची भूमी आहे.
बिहारी लोकांच्या डीएनएमध्ये ज्ञान आहे. तो बदलला जाऊ शकत नाही. त्यामुळे बिहारचे लोक जेथे जातात, तेथे त्यांचा आदर होत असतो. राष्ट्रीय जनता दलाच प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, रेड्डी यांनी माफी मागितली पाहिजे. बिहारचे लोक आपल्या बुद्धिमत्तेने मोठ-मोठ्या जागांवर पोहोचत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार व कार्यकारी डीजीपी अंजनीकुमार बिहारचेच आहेत.
काँग्रेसला बिहारींबद्दल एवढा राग का आहे? यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी बिहारी लोकांबद्दल वक्तव्य केले होते आणि आता त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते बोलले आहेत. बिहारच्या लोकांमध्ये प्रतिभा आहे व ते शेतातही काम करतात. ते कारखान्यांत काम करतात, त्याचबरोबर आयएएस-आयपीएस आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App