चंद्राबाबू नायडूंनी तुरुंगातून पक्ष कार्यकर्त्यांना लिहिले पत्र, म्हणाले ”’मी तुरुंगात नाही, तर… ”

चंद्राबाबू नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती

विशेष प्रतिनिधी

आंध्र प्रदेश : तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले चंद्राबाबू नायडू यांनी तुरुंगातून पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, पक्षाचा जाहीरनामा त्यांनी वचन दिल्याप्रमाणे दसऱ्यालाच प्रसिद्ध केला जाईल. चंद्राबाबू नायडू हे कौशल्य विकास घोटाळ्यात एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. Chandrababu Naidu wrote a letter to party workers from jail

पक्षाच्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात चंद्राबाबू नायडू म्हणाले की, पक्षाचा संपूर्ण अधिकृत जाहीरनामा दसऱ्याला प्रसिद्ध केला जाईल. चंद्राबाबू नायडू यांनी लिहिले की ते तुरुंगात नसून लोकांच्या हृदयात आहेत आणि तेलुगू लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे. त्यांनी आरोप केला की सत्ताधारी YSRCP त्यांना तुरुंगात ठेवून लोकांपासून दूर ठेवू इच्छित आहे कारण त्यांना निवडणूक हरण्याची भीती आहे. तसेच आपल्यावरील आरोप खोटे असून आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोपही नायडू यांनी केला.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात नायडू यांनी लिहिले की, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची पत्नी नारा भुवनेश्वरी पक्षाचे नेतृत्व करतील आणि निजम गेलावाली मोहिमेअंतर्गत लोकांना भेटतील. नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी वायएसआरसीपी प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर सोशल मीडिया पोस्टद्वारे टीका केली. त्याचवेळी, कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी निकाल देईपर्यंत आंध्र प्रदेश पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांना फायबर नेट प्रकरणात अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Chandrababu Naidu wrote a letter to party workers from jail

हत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात