अद्याप यासाठी बीसीसीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. Champions Trophy India vs Pakistan match to be played in Lahore on March 1
विशेष प्रतिनिधी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाईल, 10 मार्च हा राखीव दिवस असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यासाठी विंडो शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुढील वर्षी 1 मार्च रोजी लाहोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचा महत्त्वाचा सामना निश्चित केला आहे. मात्र, या तात्पुरत्या वेळापत्रकाला बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही. आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ सदस्याने बुधवारी पीटीआयला ही माहिती दिली.
1996 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा पाकिस्तान एखाद्या मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करेल. तसं पाहिलं तर 2008मध्येही पाकिस्तानने आशिया कपचे यजमानपद घेतले होते आणि मागील वर्षीही याच स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानात झाले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही की ते आयसीसी स्पर्धेसाठी संघ पाकिस्तानला पाठवतील की नाही.
पीसीबी अध्यक्षांनी 15 सामन्यांचे वेळापत्रक सादर केले
रिपोर्टनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी 15 सामन्यांचे वेळापत्रक सादर केले आहे. ज्यामध्ये सुरक्षा आणि लॉजिस्टिक कारणास्तव भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्यात आले आहेत. आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने सांगितले की, “पीसीबीने 15 सामन्यांचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मसुदा सादर केला आहे. सात सामने लाहोरमध्ये, तीन कराचीमध्ये आणि पाच रावळपिंडीमध्ये होणार आहेत. सलामीचा सामना कराचीमध्ये होणार आहे, तर दोन सामने उपांत्य फेरीचे आयोजन कराची आणि रावळपिंडी येथे केले जाईल याशिवाय, सर्व भारतीय सामने (उपांत्य फेरीसह, जर संघ पात्र ठरला तर) लाहोरमध्ये खेळले जातील.
आठ संघ दोन गटात विभागले गेले
भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. अलीकडेच, आयसीसी इव्हेंट्सचे प्रमुख ख्रिस टेटली यांनी इस्लामाबादमध्ये पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची भेट घेतली त्यानंतर सुरक्षा पथकाने स्थळांची आणि इतर व्यवस्थांची पाहणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App