इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा काँग्रेसला सुप्रीम कोर्टात दिलासा; निवडणूक संपेपर्यंत 3,567 कोटींची थकबाकी वसुली न करण्याचा निर्वाळा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “इंडिया” आघाडीने रामलीला मैदानावर मोठी रॅली घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले तरी प्रत्यक्षात मोदी सरकारने सुरू केलेल्या कायदेशीर कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या नोटिसा मागे घेणे तर सोडाच, उलट नोटीसांपाठोपाठ नोटीसा देण्याचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसची नेमकी इन्कम टॅक्स थकबाकी तरी किती आहे??, असा सवाल तयार झाला आहे. Centre tells Supreme Court it will not take action against Congress over 3,500 crore tax demand until end of elections

पण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला निवडणूक काळापुरता दिलासा दिला आहे. काँग्रेसने इन्कम टॅक्स नोटीसीविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. त्यावेळी त्यांनी निवडणूक संपेपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काँग्रेसची 3567 कोटी रुपयांची कर थकबाकी वसूल करण्याच्या मागे लागणार नाही. कर भरण्याची सक्ती करणार नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला कालच नवी नोटीस दिली होती. ज्यामध्ये 2014-15 ते 2016-17 या वर्षांसाठी 1,745 कोटींच्या कराची मागणी करण्यात आली होती.

या नव्या नोटिशीसह, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काँग्रेसकडे एकूण तब्बल 3,567 कोटींच्या कराची मागणी केली. ही नवीन कराची नोटिस 2014-15 (663 कोटी रुपये), 2015-16 (सुमारे 664 कोटी रुपये) आणि 2016-17 (सुमारे 417 कोटी रुपये) याच्याशी संबंधित आहे. मात्र आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने सुप्रीम कोर्टात कर थकबाकी वसुलीसाठी काँग्रेसवर सक्ती करणार नाही. लोकसभा निवडणुका होईपर्यंत पक्षाने ती रक्कम भरली नाही तरी चालेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्वतःहून दिलासा दिल्याचे मानण्यात येत आहे.

तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये असेल्या थर्ड पार्टी एन्ट्रीवरही काँग्रेसला कर लावण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांनी दावा केला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने शुक्रवारी पाठवलेल्या नोटीशीत सुमारे 1823 कोटी रुपये भरण्यास सांगितले होते. पक्षाच्या खात्यातून गेल्या वर्षी १३५ कोटी रुपये काढले होते.

पण थर्ड पार्टी नोंदीवर बाकी कुठल्याही पक्षांवर कुठलाच कर लावला गेलेला नाही तो फक्त काँग्रेसवर लावला आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचे हत्यार चालवत भाजप प्रमुख विरोधी पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली असून, सर्व राजकीय पक्षांमध्ये समतोल राखला जावा यासाठी विनंती केली आहे.

मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आता काँग्रेसला कर थकबाकी वसुली करण्याची सक्ती करणार नसल्याचा दिलासा दिल्याने पक्षाची दैनंदिन खर्चाची तसेच प्रचार खर्चाची आर्थिक अडचण दूर झाली आहे.

Centre tells Supreme Court it will not take action against Congress over 3,500 crore tax demand until end of elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात