
जबाबदार असलेल्या सर्व अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल केले जाणार
प्रतिनिधी
नवी दिल्ली – PM Modi Security Breach: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील उल्लंघनाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहसचिवांनी पंजाबच्या मुख्य सचिवांशीही बोलून पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या त्रुटीसाठी जबाबदार असलेल्या सर्व अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल करावे, असे सांगितले. यानंतर या महिन्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कारवाईही होऊ शकते, असे मानले जात आहे. Centre seeks action taken report from Punjab over PM Modis security breach
गेल्या वर्षी ५ जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथील हुसैनीवाला येथील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा १५-२० मिनिटे अडकला होता. पंतप्रधान फिरोजपूर येथे रॅलीसाठी जात होते, जिथे ते निवडणुकीच्या दृष्टीने ४२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार होते, परंतु त्यांची सभा पुढे ढकलावी लागली होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत सरकारी माध्यम संस्था पीआयबीने माहिती दिली होती की, पंतप्रधानांचा ताफा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापासून ३० किमी अंतरावर असलेल्या हुसैनीवाला येथून जात होता, त्यावेळी तिथे काही आंदोलकांनी उड्डाणपुलावर निदर्शने करत तो ताफा रोखला होता.
Centre seeks action-taken report from Punjab over PM Modi's security breach
Read @ANI Story | https://t.co/JFKKjvjsIe#PMModi #NarendraModi #Punjab #securitybreach pic.twitter.com/wA0laMAfmS
— ANI Digital (@ani_digital) March 12, 2023
सुरक्षेतील त्रुटींना फिरोजपूरचे एसएसपी जबाबदार
सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत चौकशी समितीही स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार या संपूर्ण प्रकरणासाठी फिरोजपूरच्या एसएसपीला जबाबदार ठरवण्यात आले होते. पुरेसा फौजफाटा असूनही फिरोजपूर एसएसपी आपले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याचे एससी पॅनेलने म्हटले होते.
न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाच्या आधारे, सांगण्यात आले होते की पंतप्रधानांचा कार्यक्रम नियोजित होता, तरीही एसएसपीला दोन तास अगोदर कळवण्यात आले की पंतप्रधानांचा ताफा त्या मार्गावरून जाणार आहे.
Centre seeks action taken report from Punjab over PM Modis security breach
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरू-म्हैसूर प्रवास आता तीन तासांऐवजी फक्त ७५ मिनिटांत पूर्ण होणार
- Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
- राष्ट्रवादीच्या वाड्याला सुरूंग; जिल्हा बँक निवडणुकीत नगर नंतर जळगावातही राष्ट्रवादीला भाजपचा झटका!!
- संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी