विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पेगॅसस कथित पाळतप्रकरणावरून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र सादर करताना यात लपविण्यासारखे काहीही नसल्याचे स्पष्ट केले.केंद्र सरकारने याप्रकरणी विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तयारी दर्शविली आहे.Central Govt. will ready for appoint panal
पेगॅसस कथित पाळतप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठविली असतानाच या प्रकरणामध्ये काहीही लपविण्यासारखे नाही असा दावा करतानाच सरकारने याप्रकरणाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने याबाबतचे एक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील काही निवडक लोकांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप करत अनेकांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती. तशी मागणी करणाऱ्या काही याचिका या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, की ‘‘ राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने देखील याचा विचार करण्यात येईल कारण हे प्रकरण संवेदनशील आहे. आम्ही देखील याचा फार संवेदनशीलपणे विचार करत आहोत. हे प्रकरण तांत्रिक आणि अधिक क्लिष्ट असल्याने तज्ज्ञांनीच याचा आढावा घेणे गरजेचे आहे. यात लपविण्यासारखे काहीही नाही. ’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App