विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना काळातील केंद्र – राज्य संघर्षाच्या स्टोरीज नुसत्याच रंगविलेल्या आहेत. त्या वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असा स्पष्ट खुलासा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केंद्र – राज्य संबंधांवर विशेषतः प्रशासकीय अधिकारी पातळीवरच्या संबंधांवर या मुलाखतीत सविस्तर भाष्य केले. केंद्र – राज्य संबंधांमधील तणाव कामामध्ये अडथळा ठरत नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. central govt must not be blamed, says iqbal chahal, BMC commisioner
इक्बाल चहल म्हणाले, की मूळात केंद्र – राज्य संघर्षाच्या बातम्या ज्या मीडियात येताहेत त्या वस्तुस्थितीवर आधारित नाहीत. दोन्ही बाजूंच्या चर्चा प्रामुख्या प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी पातळीवर होतात. त्या चर्चा दोन सहकाऱ्यांमध्ये होत असल्यासारख्याच असतात. यामध्ये फक्त एखाद – दुसऱ्या बॅचच्या अधिकाऱ्यांचा फरक असतो. त्यांचात चकमक अशी उडतच नाही. उलट दोन्ही बाजूंचे अधिकारी सध्या शिकताहेत.
कारण सध्यासारखी परिस्थिती आम्ही कोणीही कधी अनुभवलेली नाही. उदाहरणार्थ मी कॅबिनेट सेक्रेटरींना सूचविले, की आम्हाला ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करण्याची परवानगी द्या. ते म्हणाले, होय त्याच्यावर विचार सुरू आहे. पण काही समस्या आहेत. त्यानंतर माझ्याच लक्षात आले की संपूर्ण ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करणे शक्य नाही. कारण त्याचा हवेतच स्फोट होण्याचा धोका आहे. गोष्टी नीट समजून घेतल्यात तर हे लक्षात येईल.
-केंद्रावर दोषारोप अजिबात नकोत
ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र – राज्य यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, यावर स्पष्ट मत व्यक्त करताना इक्बाल चहल म्हणाले की याबाबत तर मी अधिक स्पष्ट आणि परखड बोलू इच्छितो. केंद्र सरकारवर अजिबात दोषारोप ठेवताच कामा नये. दोषारोप ठेवायचाच असेल, तर तो राज्यांवर ठेवा. कारण कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत घोळ आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आम्ही कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत प्रामाणिक राहिलो आहोत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०००० च्या पुढे असल्याचे आम्ही उघडपणे सांगतोय. बाकीची राज्ये आम्हाला हसतात.
पण ती राज्ये स्वतःकडच्या कोरोना केसेसचा आकडा खरा मानायलाही तयार नाहीत. आपल्याच शेजारच्या राज्यातला आकडा ६००० च्या आसपास दाखविला आहे. महाराष्ट्रात मात्र ६०००० आकडा आहे. पण त्या राज्याने योग तपासणी केली तर त्यांच्याकडचा आकडा वाढलेला दिसेल. जर आकडे लपविले किंवा खोटे सांगितले तर केंद्र सरकार ऑक्सिजनपासून इतर सुविधांचा पुरवठा योग्य प्रमाणात कसा काय करू शकेल??
जिथे आकडा कमी दाखविला जाईल तिथे ऑक्सिजनपासून इतर सुविधांचा पुरवठा त्या आकड्यानुसार कमीच असेल ना… अशा वेळी केंद्र सरकारला दोष देऊन चालणार नाही. कोरोनाचे आकडे खरे सांगा. मृतांचेही आकडे खरे सांगा, अशा मुख्यमंत्र्यांच्या आम्हाला सूचना आहेत.
मुंबईतल्या ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी काही सेंकदांमध्ये सोडिविली. जामनगरच्या रिलायन्स इंडस्ट्रीतून मुंबईला ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यांनी मला सांगितले की एकाच शहरासाठी अशी अलॉटमेंट करता येणार नाही. मी म्हणालो, की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अलॉटमेंट करा. मी त्यातला काही भाग मुंबईक़डे वळवितो. काम ताबडतोब झाले. मुंबईला १२५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा झाला, अशी आठवण इक्बाल चहल यांनी करवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App