विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवूनही अनेक ठिकाणी तुटवडा जाणवला. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात अखंड पुरवठा होत आहे का हे तपासण्यासाठी मॉक ड्रिल करण्याच्य सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.Central government on alert mode to fight corona, mock drill instructions to check oxygen supply
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन उपकरणे आणि प्रणाली बाबतची स्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. केंद्र सरकारने त्यांना उपकरणे, तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य ढरअ प्लांट्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट्स आणि मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टम उपलब्ध करून मदत केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ते पूर्णपणे कार्यान्वित आहे का हे तपासण्यासाठी मॉक ड्रिल करण्यास सांगितले आहे. यातून ऑक्सिजनचा आवश्यक प्रमाणात दाब आणि शुद्धतेसह ऑक्सिजन त्यांच्या बेडसाइडवर इच्छित रूग्णांपर्यंत पोहोचतो आहे का याचा आढावा घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारकडून अनेक राज्यांना ऑक्सिजन उपकरणे आणि यंत्रणा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप राज्यांना जिल्हा पातळीवर त्या वितरित केल्या नाहीत. अनेक जिल्ह्यांत यंत्रणा उभारल्या असूनही कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत, याबाबत आरोग्य सचिवांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारने आत्तापर्यंत एकूण 3,783 मेट्रिक टन ¸ऑक्सिजन क्षमतेसह विविध स्त्रोतांकडून एकूण 3,236 संयंत्रे देशात पुरविली आहेत. त्याचबरोबर 14,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान केले आहेत. देशातील 1,374 हॉस्पिटल्समध्ये 958 ऑक्सिजन स्टोअरेज टँक आणि मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टिमच्या उभारणीसाठी निधी देण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App