विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं मोदी सरकार अनेक दिलासादायक निर्णय घेत आहे. आता केंद्र सरकारनं कोरोनावरील लसी आणि ऑक्सिजनवरील आयातीवर लागणारे सीमा शुल्क आणि आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen
कोरोना किंवा इतर आजारासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या आयातीवरील शुल्कही यामध्ये माफ केला जाणार आहेत.
त्यात ऑक्सिजनबरोबरच त्यासाठीचे जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरही ही सूट लागू असणार आहे. या उपकरणांच्या आयातीवर शुल्क माफ केल्यानं या सर्वांची उपलब्धता वाढेल आणि ते अधिक स्वस्तात मिळू शकतील असं मत केंद्र सरकारनं व्यक्त केलं आहे.
PM Modi chaired a meeting to review steps taken to boost oxygen availability in the country. He emphasised that there was an immediate need to augment the supply of medical-grade oxygen as well as equipment required for patient care both at home and in hospitals: Govt of India pic.twitter.com/DUtIQDj7sy — ANI (@ANI) April 24, 2021
PM Modi chaired a meeting to review steps taken to boost oxygen availability in the country. He emphasised that there was an immediate need to augment the supply of medical-grade oxygen as well as equipment required for patient care both at home and in hospitals: Govt of India pic.twitter.com/DUtIQDj7sy
— ANI (@ANI) April 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवायचा याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी महसूल विभागाला आदेश दिले की, आयात केलेले ऑक्सिजन आणि त्यासंबंधी उपकरणांना देशात तात्काळ मंजुरी द्यावी. त्याचबरोबर आयात केलेल्या लसींवरील बेसिक सीमाशुल्क पुढील तीन महिन्यांसाठी माफ करण्यात यावं.
यावेळी मोदींनी सर्व मंत्रालये आणि विभागांना ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांच्या तात्काळ पुरवठ्याबाबत एकमेकांच्या कामांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हे निश्चित करण्यात आलं की, ऑक्सिजन आणि ऑक्सिजनसंबंधी इतर उपकरणांच्या आयातीवरील बेसिक सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर पुढील तीन महिन्यांसाठी तात्काळ प्रभावानं सूट देण्यात यावी, असे आदेशही दिले.
या वस्तू व उत्पादनांवरील आयात शुल्क आणि आरोग्य उपकर माफ करण्यात आला आहे…
भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींद्वारे लसीकरण केलं जात आहे. या दोन्ही लसी देशांतर्गत तयार होतात. त्याशिवाय भारतानं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्याही आपत्कालीन वापराल मंजुली दिली आहे. त्यामुळं या लसीचे जवळपास 20 कोटी डोस हैदराबादमध्ये तयार केले जाणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App