वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Center’s budget संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सोमवारी गोंधळातच सुरू झाले. मतदार यादीतील कथित हेराफेरीवर चर्चेची मागणी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केली. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सरकारला घेरले. त्याच वेळी सरकारने विरोधकांचे आरोप फेटाळले. लोकसभेत निवडणूक आयोगाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, प्रत्येक विरोधी राज्य मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करत आहे. महाराष्ट्रातील काळी व पांढरी मतदार यादी संशयास्पद आहे. यावर चर्चा व्हावी. दरम्यान, तृणमूलच्या खासदार सौगत रॉय म्हणाल्या, ममता बॅनर्जींनी हरियाणा, बंगालच्या मतदार यादीत समान इपिक क्रमांकाच्या मतदार ओळखपत्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. पुढच्या वर्षी बंगाल आणि आसाममध्ये निवडणुका असल्याने संपूर्ण मतदार यादीची पुनर्रचना करावी. राहुल यांनी सोशल मीडियावर लिहिले, महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेबाबत माझ्या पत्रकार परिषदेला महिना उलटूनही आयोगाने मागण्या पूर्ण केेल्या नाहीत.Center’s budget
बंगालमध्ये मतदार याद्यांची तपासणी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल म्हणाले होते की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे, यावरून बनावट मतदारांची भर पडल्याचे दिसून येते. याची चौकशी झाली पाहिजे. तृणमूल काँग्रेसने १० दिवसांपूर्वी डुप्लिकेट मतदार ओळख क्रमांक किंवा इपिकचा मुद्दा उपस्थित केला होता.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मतदार यादीतील कथित अनियमिततांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. तृणमूलच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने म्हटले होते की, वेगवेगळ्या राज्यांमुळे इपिक क्रमांकांची डुप्लिकेशन होऊ शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की मतदार डुप्लिकेट किंवा बनावट आहेत. तथापि, तीन दिवसांपूर्वी आयोगाने सांगितले की डुप्लिकेट इपिकची समस्या जुनी आहे.
शिक्षण धोरण : द्रमुकने म्हटले, दबाव आणून केंद्र निधी थांबवतेय… प्रधान यांचे प्रत्युत्तर- द्रमुक राजकारण करतेय
नवीन शैक्षणिक धोरणावरून सभागृहात गदारोळ झाला. तामिळनाडू नवीन शिक्षण धोरणाला विरोध करत असल्याने केंद्र पीएमएसश्री योजनेअंतर्गत निधी देत नाही, असा आरोप द्रमुक खासदार टी सुमती यांनी लोकसभेत केला. याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, द्रमुक भाषेवरून वाद निर्माण करत आहे. हा अलोकतांत्रिक, असंस्कृत आणि बेइमान पक्ष आहे. तो राजकारणासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करत आहे. या भाष्यावर गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर द्रमुक खासदार कनिमोझींनी प्रधानांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. यानंतर प्रधानांनी शब्द मागे घेतले. द्रमुकने प्रधानांवर विशेषाधिकार भंगाची नोटीस आणण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी प्रधांनांची टिप्पणी म्हणजे राज्याचा अपमान म्हटले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, केंद्रीय मंत्री स्वत:ला अहंकारी राजा समजत आहेत. त्यांनी जीभेवर नियंत्रण ठेवावे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App